मुंबई

गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग

CD

खारघर, ता. ८ (बातमीदार) : सहकार भारती महानगर पनवेल, रायगड जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, जिल्हा उपनिबंधक कार्यालय (सिडको) आणि सहाय्यक निबंधक (पनवेल) यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेलमध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी आणि सभासदांसाठी १४ फेब्रुवारीला विशेष प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण वर्गाला सोसायटीच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ‘सहकार भारती’च्या वतीने करण्यात आले आहे.

पनवेल परिसरातील सहकारी गृहनिर्माण संस्थांचे कामकाज अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम व्हावे आणि ‘आम्हीच आहोत आमच्या सोसायटीचे शिल्पकार’ हे उद्देश समोर ठेवून प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्‍घाटन सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशचे महामंत्री आणि महाराष्ट्र राज्य सहकार धोरण उच्चस्तरीय समितीचे सदस्य विवेक जुगादे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार भारतीचे अध्यक्ष उदय जोशी हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिरात प्रमुख अतिथी म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, तसेच सहकार विभागातील अलिबागचे जिल्हा उपनिबंधक तनवीर पाटील, सिडकोचे उपनिबंधक प्रताप पाटील, सिडकोचे सहाय्यक निबंधक शंकर पाटील आणि पनवेलच्या सहाय्यक निबंधक भारती काटुळे यांचाही प्रमुख उपस्थितीत समावेश आहे. हे शिबिर सकाळी साडेनऊ वाजता नवीन पनवेल सेक्टर-१६ मधील रामचंद्र मिशन, प्लॉट नं. २ ओ या ठिकाणी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zilla Parishad Panchayat Samiti Election result Live Update: महाड दासगावमध्ये शिवसेनेचा दणदणीत विजय, भरत गोगावलेंच्या मतदारसंघात संपूर्ण पॅनलवर बाजी

Solapur ZP election Results : माजी आमदार राम सातपुतेंची पत्नी विजयी, उत्तम जानकरांच्या मुलाचा पराभव; विधानसभेच्या पराभवाचा वचपा काढला

Pune ZP, Panchayat Samiti Result : पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीने बहुमताचा आकडा ओलांडला, पुण्यात कुठे कसा निकाल?

Kankavli Election Result : कणकवलीत शिंदेंच्या शिवसेनेचे वर्चस्व! रफिक नाईक ठरले 'टफ फायटर', पण विजय गुरुप्रसाद शिंदेंचाच; रामचंद्र राऊत तिसऱ्या क्रमांकावर

Kolhapur ZP : रिल्स स्टार काँग्रेस उमेदवार सोनाली सावंत विजयी, शिरोळमध्ये राजू शेट्टींनी खाते उघडले, गणपतराव पाटील, यड्रावकर गटासोबत जोरदार चुरस

SCROLL FOR NEXT