मुंबई

पाटील बालमंदिर शाळेत त्रिदल नॉलेज सिटी प्रकल्प

CD

पाटील बालमंदिर शाळेत त्रिदल नॉलेज सिटी प्रकल्प
कल्याण, ता. ८ ( वार्ताहर) : मोहने येथील त्रिदल एज्युकेशन सोसायटीच्या पाटील बालमंदिर शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी “संस्कृती, परंपरा आणि इतिहास” या विषयावर त्रिदल नॉलेज सिटी प्रकल्प हा एक महत्वपूर्ण शैक्षणिक प्रकल्प यशस्वीरीत्या राबविण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीची ओळख निर्माण करणे, पारंपरिक मूल्यांचे महत्त्व समजावून सांगणे तसेच भारताच्या गौरवशाली इतिहासाची माहिती देणे हा होता. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भाषण, नाट्यछटा, गीत, वेशभूषा व चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून आपली कला सादर केली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व पालकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, सामाजिक जाणीव आणि नैतिक मूल्ये रुजतात, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. पाटील बालमंदिर शाळेच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटावा, हीच या कार्यक्रमाची खरी फलश्रुती ठरली.
या कार्यक्रमासाठी केडीएमसीच्या महापौर हर्षाली चौधरी थविल, कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे, नगरसेवक गणेश कोट, रोहन कोट, राहुल कोट, नगरसेविका तेजश्री गायकवाड, माजी नगरसेवक दुर्योधन पाटील, दशरथ तरे,सामाजिक कार्यकर्ते सुरेश सोनार, जेसी कटारिया, रामा कांबळे, वैभव पाटील आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात; चार वेळा कार झाली पलटी, चालक जागीच ठार, गाडीचे दरवाजे कापून मृतदेह काढला बाहेर

Trimbakeshwar Land Acquisition : "कवडीमोल दरात जमिनी नकोत!" त्र्यंबकेश्वरच्या शेतकऱ्यांचा कुंभमेळा कामांना विरोध

Latest Marathi News Live Update : पुणे जिल्हा नियोजन समितीची आज पहिली बैठक

Aquarius Mahayog: कुंभ राशीत तयार होतोय दुर्लभ महायोग! ‘या’ राशींसाठी धोक्याची घंटा? जाणून घ्या संपूर्ण भविष्य

Nagpur News: सीईओ साहेब, केवळ एक सही द्या हो! शेकडो दिव्यांग विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ; जी. आर.चा फटका

SCROLL FOR NEXT