मुंबई

जांभूळ, शहरी शेतीवर संशोधन

CD

जांभूळ, शहरी शेतीवर संशोधन
बदलापूरमधील केंद्राला राज्य सरकारची तत्त्वतः मान्यता

बदलापूर, ता. ८ (बातमीदार) : बदलापूरमध्ये अत्याधुनिक दर्जाचे जांभूळ आणि शहरी शेती संशोधन केंद्र स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने या केंद्रासाठी आवश्यक जमीन शोधण्याचे स्पष्ट आदेश संबंधित मंडळ अधिकाऱ्यांना दिले आहेत. या विषयावर स्थानिक आमदार किसन कथोरे, कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे आणि या उपक्रमासाठी सतत पाठपुरावा करणारे बदलापूर जांभूळ ट्रस्टचे अध्यक्ष आदित्य अरविंद गोळे यांच्यात टेलिकॉन्फरन्सद्वारे सखोल चर्चा झाली होती. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयातून या प्रस्तावाबाबत सविस्तर माहिती मागविण्यात आली होती. गोळे यांनी मुख्यमंत्री कार्यालयासह कृषी मंत्रालयाला संपूर्ण माहिती सादर केली असून, त्याची गंभीर दखल घेत राज्य सरकारने बदलापूरमध्ये या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला तत्त्वतः मान्यता दिली आहे.
बदलापुरात उत्पन्न होणारे जांभूळ हे औषधी आणि विविध पोषक घटकांनी समृद्ध असल्याची माहिती आदित्य गोळे यांच्या मागील सात ते आठ वर्षांच्या पाठपुराव्याने समोर आली आहे. त्यामुळे बदलापुरात जांभूळ संशोधन केंद्र असावे याचा पाठपुरावादेखील गोळे हे मागील अनेक वर्षांपासून करत आहेत. त्यामुळे त्यांच्या या पाठपुराव्याला यश येत आहे. हे जांभूळ व शहरी शेती संशोधन केंद्र देशातील अशा स्वरूपाचे पहिले केंद्र ठरणार असून, त्यामुळे बदलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार आहे. या केंद्रामार्फत जांभूळ लागवड, उत्पादनवाढ, प्रक्रिया, मूल्यवर्धन तसेच शहरी शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानावर संशोधन केले जाणार आहे. याचा थेट फायदा शेतकरी, कृषी उद्योजक, स्टार्टअप्स तसेच विद्यार्थ्यांना होणार असून, कृषी क्षेत्रात नवकल्पनांना चालना मिळणार आहे. या अनुषंगाने लवकरच कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे हे बदलापूर दौऱ्यावर येणार आहेत.

जांभूळ वनांवर हक्क
कोकण कृषी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी बदलापूर येथे प्रत्यक्ष भेट देत, वनस्पती वन संरक्षण व शेतकरी हक्क कायदा अंतर्गत जांभूळ उत्पादक शेतकरी, आदिवासी व बागायतदार वर्गाला न्याय मिळण्यासाठी अधिकृत नोंदणी प्रक्रियेला सुरुवात केली आहे. या कायद्यांतर्गत नोंदणी झाल्यानंतर बदलापूरमधील जांभूळ वनांना अधिकृत ओळख मिळणार असून, स्थानिक शेतकऱ्यांना त्यांच्या पारंपरिक व दर्जेदार जांभूळ वनांवर हक्क मिळणार आहे. विशेष म्हणजे या नोंदणीमुळे आता बदलापूरमध्येच दर्जेदार जांभूळ कलम (रोपे) निर्मिती कायदेशीररीत्या सुरू करता येणार असून, याचा थेट लाभ स्थानिक शेतकरी, आदिवासी समाज व बागायतदारांना होणार आहे.

फोटो - 205

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed : नवरदेव पळून का गेला? मंडपात पोलिसांना पाहताच धाबे दणाणले, खरं कारण आलं समोर

Karnataka Plane Crash: मोठी बातमी! कर्नाटकात विमान कोसळले; हवेत तांत्रिक बिघाड, नियंत्रण सुटलं अन्... घटनेनं खळबळ

AI Agriculture: शेतीत डिजिटल क्रांती! ‘महाविस्तार एआय’मुळे बाजारभाव आता एका क्लिकवर

Aadhaar Card For Children : पाच वर्षांखालील मुलांचं आधारकार्ड बनवणे झाले सोपे, जाणून घ्या काय आहे प्रोसेस ?

चौपाटीवर नग्न अवस्थेत फिरत होते विनोद खन्ना! महागड्या वस्तू देखील लोकांना वाटल्या, 'तो' एक निर्णय आणि आयुष्य बदललं

SCROLL FOR NEXT