बाणगंगा नदीवर धोका
झाडांच्या मुळांमुळे पुलाचे नुकसान
बोईसर, ता. ९ (वार्ताहर) : बोईसर-तारापूर मार्गावरील बाणगंगा नदीवरील पुलाच्या संरक्षण भिंतींवर, जोडभागांत तसेच पदपथावर जंगली झाडे वाढली आहेत. या झाडांची मुळे खोलवर शिरल्याने पूल कमकुवत झाल्याची तक्रार स्थानिकांकडून केली जात आहे.
बोईसर औद्योगिक वसाहतीतील हजारो कामगार, विद्यार्थी, शालेय मुले, नागरिकांच्या रोजच्या प्रवासाचा हा पूल मुख्य आधार आहे, पण झाडांमुळे पदपथ अरुंद झाला असून, स्थानिकांच्या तक्रारीनंतर ठेकेदाराने झाडे मुळासकट काढण्याऐवजी फांद्या छाटल्या होत्या. परिणामी, काही महिन्यातच झाडे पुन्हा जोमाने उगवली असून, पुलाच्या संरचनेला अधिकच धोका निर्माण झाला आहे, तर हा पूल सध्या अपघातालाही निमंत्रण देत आहे. पुलाच्या संरक्षक भिंती, जोडभाग, पदपथावर झाडांनी अतिक्रमण केले असून, खोलवर रुजलेल्या मुळांमुळे तडे गेले आहेत. त्यामुळे भीषण दुर्घटनेसाठी हा प्रकार निमित्त ठरण्याची भीती स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
--------------------
आंदोलनाचा इशारा
तांत्रिक उपाययोजना, स्ट्रक्चरल ऑडिट, रासायनिक प्रक्रिया किंवा कायमस्वरूपी दुरुस्तीबाबत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने बाणगंगेच्या पुलावर तातडीने काम झाले नाही, तर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, अशी स्पष्ट भूमिका घेत आहेत.
-----------------------
या पुलावरून भीतीच्या छायेतून प्रवास करावा लागत आहे. झाडे वेळेत काढली नाहीत, तर उद्या मोठा अपघात अटळ होईल. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने लक्ष देऊन पुलावरील झाडे काढून परिसर स्वच्छ करावा.
- गणेश घरत, स्थानिक नागरिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.