मुंबई

पदपथ अतिक्रमण वाढले

CD

पदपथ अतिक्रमण वाढले
फेरीवाल्यांच्या विळख्यामुळे स्वच्छ सर्वेक्षणात बाधा
नेरूळ, ता. ९ (बातमीदार) : नवी मुंबई महानगरपालिकेकडून अतिक्रमणविरोधी कारवाई सातत्याने सुरू असतानाही पदपथांवरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे अतिक्रमण कायम असल्याचे चित्र आहे. आतापर्यंत सुमारे एक लाख अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली असली, तरी कारवाईनंतर हे फेरीवाले पुन्हा डोके वर काढत असल्याने अतिक्रमण विभागापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
दरम्यान, पालिकेने स्वच्छ सर्वेक्षणासाठी जोरदार तयारी सुरू केली असताना पदपथ व रस्त्यांवर पसरलेले अतिक्रमण आणि अस्वच्छता अडथळा ठरत आहे. विशेषतः तळलेले पदार्थ विकणाऱ्या फेरीवाल्यांमुळे पदपथांवर तेलाचे मोठे डाग पडले असून, परिसर अस्वच्छ दिसत आहे. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षणात गुण कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सीवूड्स रेल्वे स्थानक परिसरातील समस्यांकडे ठाकरे गटाचे समीर बागवान यांनी लक्ष वेधले आहे. काही दुकानदारांकडून पादचारी मार्ग ग्राहकांसाठी वापरला जात असून, यामुळे पादचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.

चौकट
अवैध पार्किंगची समस्या होतेय असह्य
अवैध रिक्षा पार्किंग व वाहतूक कोंडी ही सीबीडीमधील मुख्य रस्ते, चौक व सार्वजनिक ठिकाणी दिसून येणारी मोठी समस्या बनली आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी, अपघाताची शक्यता तसेच नागरिकांच्या दैनंदिन वेळेचे मोठे नुकसान होत आहे. ही बाब वारंवार निदर्शनास आणूनही केवळ तात्पुरत्या स्वरूपाची कारवाई होत असल्याचे चित्र आहे. पालिकेने वाहतूक विभागाकडे तातडीने व ठोस व्यवस्थापन करून अवैध रिक्षा पार्किंगवर विशेषतः सातत्यपूर्ण, कठोर व नियमबद्ध कारवाईचे स्पष्ट निर्देश द्यावेत, तसेच केवळ कारवाई पुरती न ठेवता प्रत्यक्ष अंमलबजावणी व देखरेख वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

कोट
सीवूड्स विभागात नागरिकांकडून अनेक तक्रारी आमच्याकडे आले आहेत. यात प्रामुख्याने सार्वजनिक आरोग्य, सुरक्षितता व शहराच्या शिस्तीची थेट संबंधित असल्याने पालिकेने तातडीने यावर कारवाई करावी व नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी पालिकेकडे केली आहे.
- समीर बागवान, ठाकरे गट, उपशहरप्रमुख सीवूड्स विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratnagiri Alphonso mango : रत्नागिरी हापूस आता एआय तंत्रज्ञानावर; मोबाईल ॲपवरून बागेचे व्यवस्थापन होणार, हापूस शेतीत डिजिटल क्रांती

'चला हवा येऊ द्या' मध्येपण तेच काम करायचं होतं तर पुन्हा हास्यजत्रेत का नाही गेलास? गौरव मोरे म्हणतो- अरे तुम्ही लोक...

Latest Marathi News Live Update : पुणे जिल्हा नियोजन समितीची आज पहिली बैठक

परभणीत ठाकरेंच्या शिवसेनेचे सय्यद इकबाल महापौर, तर काँग्रेसचा उपमहापौर

Bhagat Singh Koshyari : "राज ठाकरे मोदींना जास्तच घाबरलेत"; भगतसिंह कोश्यारींचा राज ठाकरेंना खोचक टोला

SCROLL FOR NEXT