तळा तालुक्यात राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व
सर्वच्या सर्व जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी
तळा, ता. ९ (प्रतिनिधी) ः तळा तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधकांचा धुरळा उडवत सर्वच्या सर्व जागांवर विजय मिळवला आहे. जिल्हा परिषदेच्या दोन आणि पंचायत समितीच्या चार अशा सहाही जागा जिंकून राष्ट्रवादीने तालुक्यात आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून सुरू झालेल्या मतमोजणीत पहिल्या फेरीपासूनच राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी घेतलेली आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहिली.
ग्रामीण भागात आजही सुनील तटकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पकड घट्ट असल्याचे या निकालाने स्पष्ट केले आहे. चरई खुर्द जिल्हा परिषद गटात शेकापच्या करुणा पातेरे यांना २२९ मते मिळाली, तर बोरघर हवेलीत अपक्ष संतोष आमले यांना ४६६ मते मिळाली.
जल्लोष टाळला; संयमी विजय
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे विजयानंतर कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढण्यात आली नाही. गुलाल न उधळता किंवा फटाके न फोडता केवळ विजयी उमेदवारांना शुभेच्छा देऊन साधेपणाने हा विजय साजरा करण्यात आला. या वेळी पक्षाचे सर्व स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गट विजयी उमेदवार (मते) पराभूत उमेदवार (मते)
चरई खुर्द गीता जाधव (६,७८३) अस्मिता शिगवण शिवसेना (१,५२९)
रहाटाड नलिनी नरेंद्र लोखंडे (५,०९८) रोहिणी पिंपळे - शिवसेना (२,७७०)
गण विजयी उमेदवार (मते) पराभूत उमेदवार (मते)
रहाटाड नथुराम मुकण (२,२७७) चंद्रकांत मुकण - शिवसेना (१,३८८)
बोरघर हवेली रविंद्र मांडवकर (३,६२५) अनंत खराडे - शिवसेना (३८१)
चरई खुर्द अक्षरा कदम (२,७८७) सुलभा काप - शिवसेना (१,२१४)
मांदाड रुपाली तांडेल (२,९९३) रोशनी तांदलेकर - शिवसेना (१,१८२)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.