मुंबई

बँक ऑफ इंडिया–शिव मंदिर रस्त्यावर अतिक्रमणाचा विळखा

CD

बँक ऑफ इंडिया-शिवमंदिर रस्त्यावर अतिक्रमणाचा विळखा
पदपथ गायब; नागरिकांना रस्त्यावरून चालण्याची वेळ
खारघर, ता. ९ (बातमीदार) : खारघर सेक्टर ७ मधील बँक ऑफ इंडिया ते शिवमंदिर, घरकुल व डेली बाजारकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे. फेरीवाल्यांनी पदपथ व रस्त्याच्या कडेला हातगाड्या लावल्या असून, अनेक दुकानदारांनी दुकानासमोरील मार्जिनल स्पेसमध्ये थेट सामान मांडले आहे. परिणामी पादचाऱ्यांसाठी राखीव असलेला पदपथ जवळजवळ नाहीसा झाला आहे.
हा रस्ता परिसरातील सर्वाधिक वर्दळीपैकी एक आहे. सकाळ-संध्याकाळी कार्यालयीन वेळेत वाहनांची प्रचंड ये-जा असते. पदपथ नसल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांना रस्त्यावरून चालावे लागत असून, अपघातांचा धोका वाढला आहे. रस्त्याची रुंदी कमी झाल्याने वाहतूक कोंडीही नित्याची झाली आहे.

चौकट
आपत्कालीन सेवांचा प्रश्न ऐरणीवर
अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद झाल्याने रुग्णवाहिका व अग्निशमन वाहनांना वेळेत मार्ग मिळेल का, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांनी फेरीवाल्यांसाठी निश्चित झोन, दुकानदारांसाठी कडक नियम आणि नियमित कारवाईची मागणी करत प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP win ZP, Panchayat Samiti Elections : जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजपच अव्वल!, निकालांवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

मोहसिन नक्वीची नवी मागणी! India vs Pakistan मॅच हवी असेल तर तिरंगी मालिका खेळवा; ज्यामध्ये भारत, पाकिस्तान अन्...

Zilla Parishad Panchayat Samiti Election result Live Update: पुणे जिल्हा परिषद निवडणुकीतून काँग्रेस हद्दपार

Teddy Day 2026: टेडी बिअर गिफ्ट करताय? ‘या’ रंगांचा अर्थ आधी जाणून घ्या, नाहीतर गैरसमज होऊ शकतो!

एक निर्माती तर दुसरा अभिनेता; एकता आणि तुषार कपूरने अजूनही लग्न का केलं नाही? स्वतः सांगितलं खरं कारण

SCROLL FOR NEXT