मुंबई

घाटकोपर-अंधेरी लिंक रोडवर अपघाताचा धोका

CD

घाटकोपर-अंधेरी लिंक रोडवर अपघाताचा धोका
गतिरोधक व बेकायदेशीर पार्किंगवर कारवाई करण्याची मागणी
घाटकोपर, ता. ९ (बातमीदार) ः घाटकोपर-अंधेरी लिंक रोडवरील सी.एस.डी. कॉलनी ते श्रेयस सिग्नल तसेच श्रेयस सिग्नल ते जागृती नगर व घाटकोपर स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू आहे. मात्र, या संपूर्ण मार्गावर गतिरोधक नसल्याने वाहनांचा वेग वाढत असून नागरिक, शाळकरी मुले व पालकांना रस्ता ओलांडताना मोठा धोका निर्माण होत आहे.
श्रेयस सिग्नल ते सी.एस.डी. कॉलनी दरम्यान जागृती नगर मेट्रो स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मध्य भागात मोठ्या प्रमाणात वाहने पार्किंग होत असल्याने सायंकाळच्या वेळेत तीव्र वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. पार्क केलेल्या वाहनांमुळे समोरून येणारी वाहने स्पष्टपणे दिसत नसल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागत असून, अपघाताचा धोका अधिक वाढला आहे.
या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी घाटकोपर अंधेरी लिंक रोडवरील बेकायदेशीर पार्किंगवर तातडीने बंदोबस्त व कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे. तसेच श्रेयस सिग्नलकडून जागृती नगरकडे येताना गार्डन व्ह्यू पॉइंट येथे गतिरोधक बसवावा, तसेच जागृती नगरकडून श्रेयसकडे जाताना मध्य भागात गतिरोधक बसवावा अशीही मागणी नागरिकांकडून होत आहे. वाहतूक पोलिस निरीक्षक चंद्रकांत कोळी यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही. पालिकेकडे गतिरोधक बसविण्याबाबत पत्रक दिले आहे. पुढील आठवड्यात या मार्गावर गतिरोधक बसवले जातील, अशी प्रतिक्रिया प्रभाग १२७च्या नगरसेविका स्‍वरुपा पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात १५ वर्षीय मुलीची घरातच प्रसूती, नाळ स्वत:च कापली अन् बाळ खिडकीत ठेवलं; वर्षभरापासून अत्याचार, एकावर गुन्हा दाखल

Pune MHADA Lottery : प्रतिक्षा संपली ! पुणे म्हाडाची ४,१८६ सदनिकांची सोडत आज, पुण्यात घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न होणार साकार

Shirdi Airport: विमानतळामुळे सुबत्ता येण्याचे स्वप्न भंगले! शिर्डी विमानतळावर विमानांची घट; काकडीतील वाहन व्यवसाय कोलमडला..

Latest Marathi News Live Update : चंद्रपूरचा महापौर आज ठरणार, 11 वाजता महापालिकेत निवडणूक प्रक्रिया सुरू होणार

Nitin Gadkari : पंचगंगा नदीवर 913 कोटींचा सहा पदरी पिलर उड्डाणपूल; गडकरींकडून प्रस्तावास मंजुरी, कागल-सातारा महामार्गाचे भाग्य बदलणार!

SCROLL FOR NEXT