मुंबई

भरधाव टँकर हॉटेलमध्ये घुसला

CD

भरधाव टँकर हॉटेलमध्ये घुसला
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात
तलासरी, ता. ९ (बातमीदार) ः मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील तलासरी तालुक्यातील वडवली येथे हायड्रोक्लोराइड लिक्विडची वाहतूक करणारा भरधाव टँकर अनियंत्रित झाल्याने थेट हॉटेलमध्ये घुसला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
हॉटेल परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा प्रकार कैद झाला आहे. टँकरच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, टँकरचालकाने मद्यप्राशन केले असण्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिस तसेच तलासरी पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात आणत टँकर बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, भरधाव वाहने, मद्यप्राशन करून वाहन चालवणे व अपुऱ्या सुरक्षा व्यवस्थांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Traffic: मुंबईत गाडी चालवणं महागणार? 'वाहतूक कोंडी कर' लावण्याचा राज्य सरकारकडे प्रस्ताव; कुणाकडून आणि किती पैसे आकारणार?

Zilla Parishad Panchayat Samiti Election result Live Update: कोकणात महायुतीचे 'शक्तीप्रदर्शन'

Sambhaji Nagar ZP Results: छ. संभाजी नगरमध्ये महायुतीच! वाचा संपूर्ण विजयी उमेदवारांची यादी

राघु पिंजऱ्यात आला...! सुकन्या मोनेचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर Viral Video

Ambasan Farmers Protest : बिबट्याची दहशत आणि महावितरणची दिरंगाई; अंबासनचे शेतकरी सोमवारपासून 'अन्नत्याग' उपोषणावर!

SCROLL FOR NEXT