मुंबई

लोकलमधील महिला प्रवाशांच्या हक्कांसाठी कटिबद्ध

CD

लोकलमधील महिला प्रवाशांच्या हक्कांसाठी कटिबद्ध
नगराध्यक्षा व उपनगराध्यक्षांचे प्रतिपादन

बदलापूर, ता. ९ (बातमीदार) : बदलापूर रेल्वे मार्गावरील महिला प्रवाशांना दैनंदिन प्रवासात भेडसावणाऱ्या विविध समस्या, अडचणी आणि असुरक्षिततेबाबत महिलांनी पुढाकार घेत आपले म्हणणे लेखी स्वरूपात मांडले आहे. हे लेखी निवेदन बदलापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे व उपनगराध्यक्षा प्रियंका दामले यांच्याकडे सादर करण्यात आले. महिला प्रवाशांचे प्रश्न तातडीने मार्गी लागावेत, यासाठी नगर परिषद स्तरावरून आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जात असून, त्यांच्या हक्कांसाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
महिला प्रवाशांची सुरक्षितता, सुविधा, स्वच्छता, गर्दी, वेळापत्रकातील विस्कळितपणा तसेच मूलभूत सोयीसुविधांबाबत अनेक गंभीर मुद्दे या निवेदनात नमूद करण्यात आले आहेत. नगराध्यक्षा व उपनगराध्यक्षा यांनी स्पष्ट केले की, पदावर येण्यापूर्वी तसेच पदभार स्वीकारल्यानंतरही या सर्व प्रश्नांबाबत रेल्वे प्रशासनाशी सातत्याने चर्चा करून ठोस पाठपुरावा केला जात असल्याचे सांगण्यात आले.
बदलापूरसह उपनगरी रेल्वे प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासातील अडचणींवर तोडगा काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न, लोकल गाड्यांचे वेळापत्रक, वाढती गर्दी, स्थानक परिसरातील स्वच्छता, पिण्याचे पाणी, प्रकाशव्यवस्था, तसेच महिला व ज्येष्ठ नागरिकांना भेडसावणाऱ्या विशेष समस्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. बदलापूर रेल्वे प्रवाशांना सुरक्षित, सोयीस्कर आणि सुकर प्रवासाचा अनुभव मिळावा, हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता. नागरिकांच्या हितासाठी रेल्वे प्रशासनाशी समन्वय राखत या सर्व प्रश्नांवर लवकरात लवकर ठोस उपाययोजना राबवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवण्यात येणार असल्याचे नगराध्यक्षा रुचिता घोरपडे व उपनगराध्यक्षा प्रियंका दामले यांनी सांगितले.


रेल्वे प्रशासनाशी पाठपुरावा!

नागरिकांच्या सुरक्षिततेला आणि सोयीसुविधांना प्राधान्य देत, बदलापूर रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाशी समन्वय राखून सातत्याने पाठपुरावा केला जाणार आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य प्रवाशांना सुरक्षित, सोयीस्कर व सुलभ प्रवासाचा अनुभव मिळावा, हाच या उपक्रमांचा मुख्य उद्देश असल्याचे मत या वेळी नगराध्यक्षा रुचिता घोरपडे व उपनगराध्यक्षा प्रियंका दामले यांनी व्यक्त केले.

फोटो - 318

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! नवं मेट्रो स्टेशन सुरू होणार; अंधेरी ते मानखुर्द मेट्रो लाईन कशी असणार? जाणून घ्या मार्ग आणि स्टेशन्स...

मोहम्मद शमी, इशान किशनसह ५ मोठ्या खेळाडूंना BCCI ने वार्षिक करारातून वगळले! जाणून घ्या त्यामागचं कारण

Chandrapur Mayor : चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाठिंब्यावर भाजपचा महापौर, काँग्रेसला मोठा धक्का; पडद्याआड नेमकं काय घडलं ?

EPFO 3.0 : PF काढणं झालं सोपं! घरबसल्या UPI ने काढा पैसे; आणखी कोणत्या सुविधा? कधीपासून करता येणार व्यवहार? जाणून घ्या सर्व माहिती

Valentines Day: प्रपोजसाठी वाघोबालाही करावी लागते वणवण अन् लावतात जीवाचीही बाजी; वाघिणीला कसं करतात इम्प्रेस?

SCROLL FOR NEXT