मुंबई

कल्याण-डोंबिवलीत ''डिप क्लीनिंग'' मोहीम

CD

कल्याण-डोंबिवलीत स्वच्छतेचा जागर
दुर्गाडी किल्ल्यावरून मोहिमेला सुरुवात
कल्याण, ता. ९ (बातमीदार) : कल्याण-डोंबिवली शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि स्वच्छतेचे मानांकन उंचावण्यासाठी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत ‘डीप क्लीनिंग’ या विशेष मोहिमेचा सोमवारी ( ता. ९) उत्साहात सुरुवात करण्यात आली. ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर श्रीफळ वाढवून आणि आई दुर्गादेवीचे दर्शन घेऊन या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. ही मोहीम ९ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत महापालिकेच्या सर्व प्रभाग क्षेत्रांमध्ये राबवली जाणार आहे. यादरम्यान केवळ मुख्य रस्तेच नव्हे, तर गल्ल्या आणि ग्रामीण भागांतही सर्वंकष साफसफाई केली जाणार आहे. ‘‘शहराचे स्वच्छतेतील रँकिंग सुधारण्यासाठी ही मोहीम निर्णायक ठरेल,’’ असे प्रतिपादन महापौर हर्षाली चौधरी थविल यांनी या वेळी केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी मोहिमेची रूपरेषा मांडली. आयुक्त अभिनव गोयल यांनी शहर शाश्वत स्वच्छ ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले, तर उपमहापौर राहुल दामले यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न करून शहर चकाचक करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, नगरसेविका अस्मिता मोरे, विजया पोटे, शालिनी वायले, रेखा चौधरी, समिना शेख, कांचन कुलकर्णी तसेच नगरसेवक गणेश जाधव, गणेश लांडगे, उमेश बोरगांवकर, मोरेश्वर भोईर, जयवंत भोईर, रमेश जाधव आणि जतिन प्रजापती उपस्थित होते. सहाय्यक आयुक्त प्रीती गाडे, आगस्तिन घुटे यांच्यासह स्वच्छता निरीक्षक आणि मोठ्या संख्येने सफाई कर्मचारी या मोहिमेत हिरिरीने सहभागी झाले होते.

९ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत मोहीम सर्व प्रभाग क्षेत्रे आणि ग्रामीण भागात राबविण्यात येणार आहे. स्वच्छ सर्वेक्षण अभियानात शहराचे मानांकन उंचावणे हा उद्देश आहे. यात लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP win ZP, Panchayat Samiti Elections : जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजपच अव्वल!, निकालांवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Mumbai Traffic: मुंबईत गाडी चालवणं महागणार? 'वाहतूक कोंडी कर' लावण्याचा राज्य सरकारकडे प्रस्ताव; कुणाकडून आणि किती पैसे आकारणार?

Zilla Parishad Panchayat Samiti Election result Live Update: भाजप आमदार राहुल आवाडे यांच्या कन्या सानिका आवाडे विजयी

Sambhaji Nagar ZP Results: छ. संभाजी नगरमध्ये महायुतीच! वाचा संपूर्ण विजयी उमेदवारांची यादी

राघु पिंजऱ्यात आला...! सुकन्या मोनेचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर Viral Video

SCROLL FOR NEXT