मुंबई

तुंबलेल्या गटारामुळे नागरिकांच्या घरात सांडपाणी

CD

तुंबलेल्या गटारामुळे नागरिकांच्या घरात सांडपाणी
आरोग्याचा गंभीर प्रश्न ऐरणीवर
तुर्भे, ता. १० (बातमीदार) : कोपरी गावात रविवारी (ता. ८) अचानक गटार तुंबल्याने सांडपाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली. गटारांतील दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावरून वाहत थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. सकाळच्या वेळेत घडलेल्या या प्रकारामुळे अनेक रहिवाशांची चांगलीच तारांबळ उडाली असून, संपूर्ण परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली होती.
गटाराचे पाणी घरात शिरल्याने अनेक कुटुंबांना सकाळचा नाश्ताही करता आला नाही. घरातील फरशी, भांडी व जीवनावश्यक वस्तू सांडपाण्यामुळे खराब झाल्या. दुर्गंधी इतकी तीव्र होती की नागरिकांना अक्षरशः नाक मुठीत धरून राहावे लागले. या सांडपाण्यामुळे संसर्गजन्य आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
‘स्वच्छ आणि सुंदर शहर’ म्हणून नवी मुंबईचा गौरव केला जात असताना, शहरातील गावांमध्ये मात्र स्वच्छतेच्या नावाखाली केवळ दिखावा होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. कोपरी गावात गटारांची नियमित व सखोल स्वच्छता होत नसल्याने गटारे कचरा व घाणीने भरलेली आहेत.

चौकट
कायमस्वरूपी उपायांचा अभाव :
विशेषतः महापालिकेच्या स्वच्छतागृहाजवळील बैठ्या चाळी परिसरात गटारांवर झाकणे नसल्यामुळे कचरा थेट गटारात अडकतो आणि पाण्याचा निचरा होत नाही. तात्पुरत्या स्वच्छतेऐवजी गटारांची संरचनात्मक दुरुस्ती, झाकणांची बसवणूक आणि नियमित यांत्रिक सफाई केली नाही, तर ही समस्या कायमची गंभीर आरोग्यधोक्यात रूपांतरित होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaysingpur Fraud Case : जयसिंगपुरात जादा परताव्याच्या आमिषाने पावणेसात कोटींची फसवणूक

Latest Marathi News Live Update : देशाच्या तपास यंत्रणांवर आमचा विश्वास नाही- संजय राऊत

Stock Market Today : शेअर बाजार लाल रंगात! IT शेअर्सला मोठा फटका, अमेरिकेचा परिणाम; कोणते शेअर्स घसरले?

Mumbai Crime: मुंबईत थरकाप उडवणारी घटना! रिक्षातून उतरली… तरीही पाठलाग सुरूच; अल्पवयीन तरुणीची अंगावर शहारे आणणारी आपबीती

कोकणच्या सागरी पराक्रमाचा पुरावा! वीरगळावर सापडले प्राचीन नौकायुद्धाचे जिवंत दृश्य, खारेपाटण ठरू शकते भविष्यातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ

SCROLL FOR NEXT