मुंबई

भिरा फाटा ते सुतारवाडी मार्गावर बंद पडलेल्या ट्रेलरमुळे धोका

CD

बंद ट्रेलरमुळे अपघाताचा धोका
मुंबई–गोवा महामार्गालगत पाच दिवसांपासून उभे अवजड वाहन
रोहा, ता. १० (बातमीदार) ः मुंबई-गोवा महामार्गाला लगत वाळंजवाडी येथील रस्त्याकडेला एक कॉइल घेऊन जाणारा ट्रेलर मागील पाच दिवसांपासून बंदावस्थेत आहे. रस्त्याच्या वळणावरच हा ट्रेलर उभा असल्याने बंद पडल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे. तर, यामुळे नागरिकांची मोठ्या अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे.
कोलाडकडून सुतारवाडी मार्गे विळा-भागाड येथील एका कंपनीकडे १०० टन वजानाच्या दोन कॉइल्स घेऊन जाणारा ट्रेलर शनिवार (ता. ७)पासून वाळंजवाडी रस्त्याकडेला बंद अवस्थेत उभा आहे. मुख्य रस्त्यावरील हे वळण अत्यंत अरुंद असून, तिथेच हे अवजड वाहन उभे राहिल्याने दोन्ही बाजूने येणाऱ्या वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे इशारा देणारे फलक लावलेले नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहन एकमेकांवर आदळण्याची शक्यता आहे. तसेच, बंदावस्थेतील या ट्रेलरला वाहने धडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे नागरिकांनी लवकरात लवकर हा ट्रेलर हलवून रस्ता मोकळा करून देण्याची मागणी केली आहे.

कोंडीने चालक त्रस्त
या परिसरात मोठ्या प्रमाणावर क्रशर खाणी असल्याने खडीने भरलेल्या डंपरची सतत वर्दळ असते. यासोबतच अवजड वाहनांचीही मोठी रहदारी असते. त्यातच हा ट्रेलर वळणावरच उभा असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. कोलाड-सुतारवाडी दरम्यान प्रवास करणाऱ्या स्थानिक नागरिक आणि प्रवाशांना यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे.

ट्रेलर तातडीने हटवावा
वाळंजवाडी ते कुडली दरम्यान अशा प्रकारे कॉइल्स वाहून नेणारे ट्रेलर वारंवार बंद पडण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे सुरक्षा धोक्यात आली असून नागरिकांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागतो. याप्रकरणी संबंधित ट्रेलर मालक आणि चालकावर कठोर कारवाई करावी आणि हा ट्रेलर तातडीने रस्त्यावरून हटवावा, अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे.


... अन्यथा कारवाई
भरा फाटा ते विले भागाड एमआयडीसी मुख्य रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. अशा परिस्थिती रस्त्यालगत बंद अवस्थेत असलेल्या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. अपघातात घडू नये म्हणून या पुढे अशा वाहन चालकांना समज दिली जाईल. अन्यथा संबधित वाहन चालकांवर सक्त कारवाई करण्यात येईल, अशी माहिती कोलाड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन मोहिते यांनी दिली आहे.


या मार्गावर अवजड वाहनांची वाहतूक होत असल्याने सतत अपघात घडत आहेत.वाहतूकी दरम्यान वाहन बंद पडल्यास स्थानिक वाहन चालक किंवा मालक गाडी दुरुस्तीचे काम तातडीने करतात मात्र अवजड वाहन चालक हे पर गावातील व पर राज्यातील असल्यामुळे वाहन त्याच परिस्थितीत सोडून पसार होतात. ही चिंतेची बाब असून त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.
- हरीशचंद्र महाडिक, स्थानिक वाहन चालक, सुतारवाडी रोहा


फोटो कॅप्शन :
रोहा ः भिरा फाटा-सुतारवाडी मार्गावर रस्त्याच्या कडेला अपघाताला निमंत्रण देणारा बंद अवस्थेत उभा असलेला ट्रेलर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaysingpur Fraud Case : जयसिंगपुरात जादा परताव्याच्या आमिषाने पावणेसात कोटींची फसवणूक

Latest Marathi News Live Update : देशाच्या तपास यंत्रणांवर आमचा विश्वास नाही- संजय राऊत

Stock Market Today : शेअर बाजार लाल रंगात! IT शेअर्सला मोठा फटका, अमेरिकेचा परिणाम; कोणते शेअर्स घसरले?

Mumbai Crime: मुंबईत थरकाप उडवणारी घटना! रिक्षातून उतरली… तरीही पाठलाग सुरूच; अल्पवयीन तरुणीची अंगावर शहारे आणणारी आपबीती

कोकणच्या सागरी पराक्रमाचा पुरावा! वीरगळावर सापडले प्राचीन नौकायुद्धाचे जिवंत दृश्य, खारेपाटण ठरू शकते भविष्यातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ

SCROLL FOR NEXT