मुंबई

वित्त व अकाउंटन्सी क्षेत्रातील संधींचा वेध

CD

वित्त व अकाउंटन्सी क्षेत्रातील संधींचा वेध
जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा डब्ल्यूआयआरसी आयसीएआय येथे अभ्यास दौरा

ठाणे, ता. १० (बातमीदार) : आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ अभ्यासक्रमापुरते ज्ञान अपुरे ठरते. प्रत्यक्ष व्यावसायिक संस्था, तंत्रज्ञान आणि भविष्यातील करिअर ट्रेंड्स यांची ओळख विद्यार्थ्यांना मिळणे अत्यंत आवश्यक आहे. याच उद्देशाने जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या एफवाय बीकॉमच्या विद्यार्थ्यांसाठी डब्ल्यूआयआरसी, आयसीएआय येथे अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.
जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या अकाउंटन्सी विभागामार्फत एफवाय बीकॉमच्या १४५ विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरा सोमवारी (ता. ९) इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय)च्या वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल (डब्ल्यूआयआरसी) येथे आयोजित करण्यात आला. या अभ्यास दौऱ्याचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना वित्त, अकाउंटन्सी आणि व्यावसायिक शिक्षणातील करिअर संधींबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळवून देणे हा होता.
या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना चार्टर्ड अकाउंटंट (सीए) या अभ्यासक्रमाची संपूर्ण रचना, परीक्षा पद्धती, आर्टिकलशिपचे महत्त्व तसेच देशविदेशातील सीए पदवीच्या संधी यांची सविस्तर माहिती देण्यात आली. या कार्यक्रमास डब्ल्यूआयआरसीचे चेअरमन सीए केतन सय्या यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते महाविद्यालयातील उपप्राचार्य प्रा. सुभाष शिंदे, डॉ. महेश पाटील, अकाउंटन्सी विभागप्रमुख सीए योगेश प्रसादे, ऑफिस सुपरिटेंडंट संजय पाटील व डेप्युटी रजिस्ट्रार पराग शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सीए योगेश प्रसादे यांनी या अभ्यास दौऱ्याचे यशस्वी आयोजन केले. अकाउंटन्सी विभागातील सीए अतुल राऊत, सीए मधुरा जोशी आणि प्रा. सिद्धेश बागवे यांचीही उपस्थिती लाभली. हा अभ्यास दौरा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत ज्ञानवर्धक, प्रेरणादायी व करिअरदृष्ट्या मार्गदर्शक ठरला.
------------------
या अभ्यास दौऱ्यातील विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेले कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) विषयावरील मार्गदर्शन सत्र. या सत्रामध्ये वित्त व अकाउंटन्सी क्षेत्रात एआयमुळे होत असलेले बदल, ऑटोमेशन, डेटा ॲनालिटिक्स, ऑडिट प्रक्रियेत एआयचा वापर आणि भविष्यात आवश्यक डिजिटल कौशल्ये याविषयी सखोल माहिती देण्यात आली. एआयमुळे अकाउंटिंग प्रक्रिया अधिक वेगवान, अचूक आणि आधुनिक होत असल्याचे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना डब्ल्यूआयआरसीमधील लायब्ररी, आयटी सेंटर आणि ‘हॉल ऑफ फेम’ या सुविधा पाहण्याची संधी मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

परभणीत ठाकरेंच्या शिवसेनेचे सय्यद इकबाल महापौर, तर काँग्रेसचा उपमहापौर

Mahadevrao Mahadik News : आप्पा महाडिकांचा एक कॉल, गोकुळ माजी अध्यक्षांच्या पोराचा जिल्हा परिषदेत 'करेक्ट कार्यक्रम'

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये मंदिरांवर चोरट्यांचा हल्ला; एकाच रात्री तीन ठिकाणी चोरीचा प्रयत्न

कर्नाटक काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा पेच? 'थोडा संयम बाळगा, मुख्यमंत्रिपद बदलाबाबत योग्यवेळी उत्तर देईन'; DK शिवकुमारांचा कोणावर निशाणा?

T20 World Cup: पाकिस्तानच्या बहिष्काराच्या निर्णयावेळी कसे होतं भारताच्या ड्रेसिंग रुमधील वातावरण? प्रशिक्षकांनी केला खुलासा

SCROLL FOR NEXT