मुंबई

शोभिवंत मासेपालन युवक-महिलांसाठी उत्पन्नाचा प्रभावी स्रोत : डॉ. केदार मोहंता

CD

शोभिवंत मासेपालन युवक-महिलांसाठी उत्पन्नाचा प्रभावी स्रोत : डॉ. केदार मोहंता
कोसबाड कृषी विज्ञान केंद्रात प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्‍घाटन
वाणगाव, ता. १० (बातमीदार) : शोभिवंत मासे पालन हा अल्प जागेत, कमी पाण्यात व मर्यादित भांडवलात सुरू करता येणारा व्यवसाय असून, युवक व महिलांसाठी तो प्रभावी उत्पन्नाचा स्रोत ठरू शकतो, असे प्रतिपादन भारतीय कृषी अनुसंधान परिषद अंतर्गत मुंबई येथील केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्थेचे मत्स्य खाद्य विभागप्रमुख डॉ. केदार मोहंता यांनी केले. कोसबाड येथील कृषी विज्ञान केंद्रात आयोजित शोभिवंत मासे पालन प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते.
ग्रामीण युवक, महिला व शेतकऱ्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षण समन्वयक डॉ. सिकेंदर यांनी शोभिवंत माशांच्या जाती, टँक रचना, पाण्याची गुणवत्ता, खाद्य व्यवस्थापन, रोग नियंत्रण, प्रजनन तंत्रज्ञान तसेच बाजारपेठ व विक्री व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विलास जाधव यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या विविध उपक्रमांची माहिती देऊन शोभिवंत मत्स्यपालन या कार्यक्रमामुळे ग्रामीण भागात मत्स्यव्यवसायाच्या नव्या संधी निर्माण होऊन युवकांचे स्थलांतर रोखण्यास मदत होईल, तसेच महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यास चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. कृषी विज्ञान केंद्राच्या या उपक्रमामुळे शेतीपूरक व्यवसायांना गती मिळून शाश्वत ग्रामीण विकासास हातभार लागेल, असे मत सहभागी युवकांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajpal Yadav's Bail Denied: राजपाल यादवला न्यायालयाकडून धक्का!, जामीन नाकारल्याने तिहार तुरुंगातील मुक्काम वाढणार

Dharashiv News: ७२ लाख ८४ हजाराची अफुची झाडे जप्त,वाशी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी संयुक्त कारवाई

Latest Marathi News Live Update : दर्यापुरात अवघ्या 7 सेकंदात जिंकली बैलगाडा शर्यत

Nashik News : "९ हजार पेन्शन द्या, अन्यथा उपोषण!"; सातपूरमध्ये पीएफ कार्यालयावर पेन्शनधारकांचा हल्लाबोल

School Punishment: छ. संभाजी नगरमधील शाळेत विद्यार्थ्यांना अमानवी शिक्षा; रबरने केस बांधले अन्...

SCROLL FOR NEXT