आरोग्य केंद्रांवर विनामूल्य तपासणी
श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी शताब्दी निमित्त शिबिर
कल्याण, ता. ११ (बातमीदार): ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम शताब्दी वर्षाचे औचित्य साधून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने नागरिकांसाठी आरोग्यसेवेचे द्वार खुले केले आहे. महापालिका प्रशासनाच्या वतीने बुधवार, ११ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत संपूर्ण शहरभरात विविध मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम शताब्दीनिमित्त २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६ रोजी खारघर (नवी मुंबई) येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. शासनाच्या निर्देशानुसार, या कार्यक्रमाची व्यापक जनजागृती करण्यासाठी केडीएमसी (KDMC) प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.
नागरिकांना त्यांच्या घराजवळच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि उपचार मिळावेत, यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे पालिकेची दोन मुख्य रुग्णालये, शहरातील एकूण २६ शहरी प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांवर विनामूल्य सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सर्व केंद्रांवर २७ फेब्रुवारीपर्यंत विविध आजारांची मोफत तपासणी आणि आवश्यक आरोग्यसेवा पुरवण्यात येणार आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
प्रशासकीय आवाहन
हा ऐतिहासिक शहिदी समागम सोहळा जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी पालिकेने हे नियोजन केले आहे. या मोहिमेबाबत माहिती देताना महापौर हर्षाली चौधरी-थविल म्हणाल्या की, "हा ऐतिहासिक शहिदी समागम सोहळा सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी आम्ही या आरोग्य शिबिरांचे नियोजन केले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. तसेच नागरिकांनी आपल्या जवळच्या महापालिका आरोग्य केंद्रात जाऊन आरोग्य तपासणी करून घ्यावी आणि या सेवाभावी उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन पालिकेमार्फत करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.