मुंबई

धारावीतील ढोरवाडा विभागात पाणीबाणी!

CD

धारावीतील ढोरवाडा विभागात पाणीबाणी
पाच दिवसांपासून शेकडो कुटुंबे वंचित
धारावी, ता. ११ (बातमीदार) : धारावीतील ढोरवाडा विभागात गेल्या १५ दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा खंडित झाल्याने शेकडो कुटुंबे पाण्याविना त्रस्त आहेत. महाराणा प्रताप नगर, खडा हनुमान, गांधी मैदान अशा वस्त्यांमध्ये अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली असून, स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दोन दिवसांत सुरळीत पाणीपुरवठा न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी पालिकेच्या ग/उत्तर प्रभाग प्रशासनाला दिला आहे.
धारावीतील विविध भागांत पालिकेतर्फे सकाळ, दुपार आणि संध्याकाळी पाणीपुरवठा केला जातो. ढोरवाडा विभागात प्रामुख्याने सकाळी पाणी सोडले जाते. मात्र गेल्या १५ दिवसांपासून नळांना पाण्याचा थेंबही येत नसल्याने रहिवासी हवालदिल झाले आहेत. विशेष म्हणजे शेजारील विभागांत नियमित पाणीपुरवठा सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
पाण्याअभावी नागरिकांना शेजारच्या भागातून केवळ १५ मिनिटे पाणी भरण्यासाठी दररोज शेकडो रुपये खर्च करावे लागत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली. घरगुती कामकाज ठप्प झाले असून, महिलांवर सर्वाधिक परिणाम झाला आहे. अंघोळ, स्वयंपाक, धुणीभांडी यांसारख्या मूलभूत गरजांसाठीही संघर्ष करावा लागत आहे. विद्यार्थ्यांना अंघोळीविना शाळेत जावे लागत असून, काहींना नैसर्गिक विधीसाठी पैसे मोजून सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर करावा लागत आहे.
दरम्यान, सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी समाजसेविका संध्या डोईफोडे यांच्यासह संजय जैस्वाल, वाडी वेलम, परशुराम डाकी आणि विजय कुंचीकोरवे प्रयत्नशील आहेत.

महिलांमध्ये संतापाची भावना
सरकार महिलांसाठी विविध योजना राबवत आहे; मात्र धारावीतील महिलांच्या पाण्याच्या मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष का, असा सवाल स्थानिक महिलांनी उपस्थित केला आहे.

पालिकेचे म्‍हणणे काय?
पाणी कमी दाबाने सोडले जात असल्याने काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. एक-दोन दिवसांत सुरळीत पाणीपुरवठा होईल. याकडे मी स्वतः लक्ष देत आहे, अशी प्रतिक्रिया ग उत्तर प्रभागाचे पाणीपुरवठा विभाग उपअभियंता खरवटेकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Leopard Attack on Farmer : पतीसाठी सावित्री होऊन धावली पत्नी! बिबट्याने शेतकऱ्यावर झडप घातली, पण ती जीवाची पर्वा न करता थेट बिबट्याशी भिडली!

Nagpur News: सावनेरमध्ये तरुणाने संपवले जीवन; मृत्यूचे कारण अद्याप गुलदस्त्यात

'आज माझी हळद आणि उद्या...' मृणालने धनुषसोबतच्या नात्याबद्दल केला खुलासा, म्हणाली.. 'मी माझ्या वडिलांना...'

Phalgun Sankranti: फाल्गुन संक्रांतीला चतुर्ग्रही योग! 'या' राशींना मिळणार मोठी गुड न्यूज, पैशाची चणचण होईल दूर

Nagpur Accident: बारावीच्या पेपरला जाताना काळाचा घाला; टिप्परच्या धडकेत बाप-लेकीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT