मुंबई

आधुनिक आणि युनानी उपचार पद्धतीत एकमेकांना पूरक

CD

आधुनिक आणि युनानी उपचार पद्धती एकमेकांना पूरक ः डॉ. कैलास पवार
ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात ‘जागतिक युनानी दिवस’ साजरा

ठाणे शहर, ता. ११ (बातमीदार) : वैद्यकीय उपचारांचा समतोल साधण्यासाठी पारंपरिक आणि आधुनिक पद्धतींचा समप्रमाणात वापर करणे रुग्णांच्या हिताचे आहे. त्यामुळे आधुनिक उपचार पद्धतीसोबतच रुग्णांनी युनानीसारख्या चिकित्सा पद्धतीचाही वापर करावा, असे आवाहन विठ्ठल सायन्ना ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी केले. ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात ‘जागतिक युनानी दिवस’ उत्साहात साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते.

युनानी उपचार पद्धती शरीर, मन आणि जीवनशैली यांचा एकत्रित विचार करून उपचार देते. प्रख्यात युनानी वैद्य हकीम अजमल खान यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जाणाऱ्या दिवसाच्या निमित्ताने युनानी उपचार पद्धतीबाबत जनजागृती करण्यासाठी आयुष मंत्रालयामार्फत देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. जिल्हा सामान्य रुग्णालयातही या निमित्ताने कार्यक्रम घेण्यात आला. त्यात युनानी वैद्यकशास्त्राचा ऐतिहासिक वारसा, त्याचे वैज्ञानिक आधार आणि आधुनिक आरोग्य व्यवस्थेतील योगदान याबाबत जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमात मधुमेह, स्थूलता, त्वचारोग, सांधेदुखी यासारख्या जीवनशैलीजन्य आजारांवर युनानी उपचारपद्धती कशी परिणामकारक ठरते हे सांगण्यात आले. संतुलित आहार-विहार, नैसर्गिक औषधोपचार आणि रोगप्रतिबंधात्मक उपायांच्या महत्त्वासह युनानी वैद्यकीय अधिकारी डॉ. अन्सारी जुबेर यांनी मार्गदर्शन केले. युनानी औषधांच्या उपयोगाविषयी माहितीपर पत्रकांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धीरज महांगडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मृणाली राहुड, डॉ. बाळासाहेब गावडे, डॉ. अन्सारी जुबेर, डॉ. सोनल रेगे, डॉ. अरुंधती सांगळे आदी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: पाकिस्तानच्या बहिष्काराच्या निर्णयावेळी कसे होतं भारताच्या ड्रेसिंग रुमधील वातावरण? प्रशिक्षकांनी केला खुलासा

Ankita Bhandari Murder: खरे पीडित अंकिताचे आई वडीलच, बाकी फक्त राजकारण करतायत! मुख्यमंत्री भावूक; म्हणाले, गुन्हेगारांना सोडणार नाही

Nirmala Sitharaman : काँग्रेसने देश विकून शेतकऱ्यांना फसविले; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा आरोप

Latur Airport: लातूर विमानतळ ‘धावपट्टीचे ऑडिट करा’; पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजेंनी विमानतळ विकास कंपनीला फटकारले!

Vishwa Marathi Sammelan : अखेर मुहूर्त ठरला! कुसुमाग्रजांच्या स्मृती दिनी नाशिकमध्ये भरणार 'विश्व मराठी संमेलन'

SCROLL FOR NEXT