ठाण्यात ‘डॉक्टर तुमच्या भेटीला’ विशेष चर्चासत्र
अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. सुबोध मेहता यांचे मार्गदर्शन
ठाणे, ता. ११ : हल्लीच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनामुळे तरुण आणि ज्येष्ठांमध्ये अस्थिविकारांचे (हाडांचे विकार) प्रमाण वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत ठाण्यातील नागरिकांसाठी ‘डॉक्टर तुमच्या भेटीला’ या विशेष आणि संपूर्ण विनामूल्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, २२ फेब्रुवारीला सकाळी १०:३० वाजता घंटाळी येथील सहयोग मंदिर हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे.
महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध हृदयविकारतज्ज्ञ डॉ. दयानंद कुम्बला यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होत आहे. यामध्ये ठाण्यातील ख्यातनाम अस्थिव्यंग उपचारतज्ज्ञ आणि ‘ठाणे गौरव’ पुरस्काराचे मानकरी डॉ. सुबोध मेहता (एम. एस. ऑर्थो.) हे मुख्य व्याख्याते म्हणून उपस्थित राहणार आहेत. वयाच्या साठीनंतर ज्येष्ठांनी वेदनामुक्त आणि आनंदी जीवन कसे जगावे?, आजच्या युगातील प्रगत अस्थिरोग उपचार पद्धती आणि सांधेरोपण आणि अस्थिबंधन उपचारांमधील आधुनिकता या विषयांवर येथे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम विनामूल्य असून, सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आयोजित करण्यात आला आहे. ठाण्यातील ज्येष्ठ नागरिकांनी आणि तरुणांनी याचा लाभ घ्यावा आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी नीला भागवत (८७७९६२९०५२/ ९९६९७८२३०३) यांच्याशी संपर्क साधावे, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
------------
चौकट
श्रोत्यांसाठी प्रश्नोत्तरे
केवळ व्याख्यानच नव्हे, तर त्यानंतर श्रोत्यांसाठी प्रश्नोत्तरे आणि शंका निरसनाचे विशेष सत्र आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये नागरिक थेट डॉक्टरांशी संवाद साधून आपल्या शारीरिक समस्यांबाबत मार्गदर्शन घेऊ शकणार आहेत. हाडांचे विकार, सांधेदुखी आणि बदलत्या जीवनशैलीमुळे होणारे अस्थिरोग टाळण्यासाठी हे सत्र अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.