मुंबई

निधी अपहार प्रकरणावरून रोष

CD

निधी अपहार प्रकरणावरून रोष
जव्हार, ता. ११ (बातमीदार)ः जव्हार, मोखाडा, वाडा तालुक्यात सामाजिक वनीकरण विभागाअंतर्गत कामांच्या निधीतील ७८ कोटी १७ लाखांचा अपहार झाला होता. याप्रकरणी १२ ऑक्टोबर २०२२ रोजी जव्हार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, पण तीन वर्षे उलटून एकाही आरोपीला अटक झालेली नसल्याने स्थानिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
आदिवासी विकास विभागाच्या पाणलोट विकास योजनेअंतर्गत ठाणे सामाजिक वनीकरण विभागाकडून तीन तालुक्यांमध्ये जल, मृदा संधारण, अनगड दगडी बांध उभारणी, तुटक समतोल चर खणण्यासाठी सुमारे ६१.२२ कोटींचा निधी वर्ग करण्यात आला होता. तसेच आदिवासी विकास विभाग, नाशिक कार्यालयामार्फत स्वतंत्रपणे १४.९५ कोटींची निधी दिला गेला. या वेळी ७४ गावांमध्ये ८९९ कामे झाल्याचे भासवून ७८ कोटी १७ लाखांची देयके अदा करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात एकही काम झाले नसल्याचे झाल्याचे तपासात उघड झाले. याप्रकरणी सामाजिक वनीकरण विभागाच्या एका अधिकाऱ्याने जव्हार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.
---------------------------------------
आदिवासीबहुल जव्हार परिसरात वन विभागाने केलेल्या ७८ कोटींच्या भ्रष्टाचारातील आरोपींवर तातडीने कारवाई झाली नाही. यासंदर्भात पालघरचे तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या जनता दरबारात मुद्दा उपस्थित केला होता.
- चित्रांगण घोलप, तालुका संघटक, ठाकरे गट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train: प्लॅटफॉर्मवर पाऊल टाकताच जीव धोक्यात! मुंबईतलं 'हे' स्थानक बनलंय मृत्यूचा अड्डा? चार वर्षांची हादरवणारी कहाणी

Accident News: भीषण अपघातात भावाचा जागीच मृत्यू; बारावीचा पेपर देऊन बहिणीला घरी नेताना घटना, आई-वडीलांचा आक्राेश!

Nagpur Accident: पिकअपच्या धडकेत महिलेचा मृत्यू; पती गंभीर तुमसर-रामटेक मार्गावरील घटना

T20 World Cup Ind vs Namibia : मोठ्या विजयाचे भारताचे ध्येय; नामिबियाविरुद्ध अभिषेक शर्मा मुकण्याची शक्यता

Maharashtra political news : ‘राष्ट्रवादी’च्या विलीनीकरणाला खो! दिल्लीतील दोन मोठ्या नेत्यांच्या सल्ल्यानंतरच निर्णय

SCROLL FOR NEXT