मुंबई

रायगड पोलिस मुख्ययालयी भरती प्रक्रिया सुरू

CD

रायगड पोलिस मुख्ययालयी भरती प्रक्रिया सुरू
पहिल्या दिवशी ८०० उमेदवारांची परीक्षा
अलिबाग, ता. ११ (वार्ताहर) ः रायगड जिल्हा पोलिस भरती प्रक्रिया अलिबाग येथील पोलिस मुख्यालयात बुधवारी (ता. ११) सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी ८०० उमेदवारांची परीक्षा घेण्यात आली. दरम्यान, ही प्रक्रिया ११ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत पार पडणार आहे.
भरती प्रक्रिया पोलिस शिपाई ९४ पदे व चालक पोलिस शिपाई तीन पदांकरिता घेण्यात येत आहे. या पोलिस भरती बंदोबस्ताकरिता ४२ पोलिस अधिकारी, ३२९ पोलिस अंमलदार व ३६ मंत्रालयीन कर्मचारी असे मनुष्यबळ तैनात करण्यात आलेले आहेत. भरती प्रक्रियेत उमेदवारांची बायोमेट्रिक, प्रत्यक्ष फोटो पडताळणी, चिप रजिस्ट्रेशन, संपूर्ण मैदान सीसीटीव्ही कॅमेराच्या निगराणीखाली, प्रत्येक इव्हेंटवर व्हिडिओ रेकॉर्डिंग, १६०० मीटर ८०० मीटर १०० मीटर इव्हेंटसाठी आरएफआयडी चिप अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून, प्रत्येक इव्हेंटसाठी अधिकारी इन्चार्ज नेमण्यात आले आहेत. कोणत्याही उमेदवाराकडून उत्तेजक द्रव्यांचे सेवन होऊ नये याकरिता उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक पथक नेमण्यात आलेले आहे. पहिल्या दिवशी बुधवारी ८०० उमेदवारांची परीक्षा घेण्यात आली. या वेळी १०० मीटर आणि १६०० मीटर धावणे, गोळाफेक अशी चाचणी घेण्यात आली. तसेच, उंची व छाती मोजण्यात येत होती.
कोणत्याही व्यक्तीकडून ओळखीचे प्रलोभन दाखवून पैशांची मागणी करत असल्यास किंवा आर्थिक गैरव्यवहार संशय आल्यास तत्काळ पोलिस अधीक्षक कार्यालयच्या क्रमांकावर संपर्क साधवा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच उमेदवारांची राहण्याची व्यवस्था अल्पदरात करावी यासाठी रायगड पोलिस दलाकडून सर्व हॉटेल, लॉजेस, घरगुती निवासस्थान व्यवस्था पुरविणारे, मंगल कार्यालय यांना आवाहन करण्यात आले आहे.


पदांचा तपशील आणि अर्जांची संख्या
पोलिस शिपाई
पुरुष २,९१५ महिला ६४८ एकूण ३,५६३ अर्ज

चालक पोलिस शिपाई
पुरुष १,६४३ महिला १६७ एकूण १,८१० अर्ज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Punishment: छ. संभाजी नगरमधील शाळेत विद्यार्थ्यांना अमानवी शिक्षा; रबरने केस बांधले अन्...

Pune Couple Friendly Park: जोडीदारासोबत एकांतात क्षण घालवायचे? पुण्यातील हे पार्क आहे बेस्ट!

३ बरगड्या फ्रॅक्चर झाल्या... 'पुन्हा साडे माडे ३'च्या सेटवर अशोक सराफ यांना झालेली दुखापत; निवेदितांनाही सांगितलं नाही कारण

Latest Marathi News Live Update : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये!

Zakir Husain Hospital : झाकीर हुसेन रुग्णालयाची दैना! इमारत सुसज्ज, पण सोयी-सुविधांचा मात्र पत्ताच नाही

SCROLL FOR NEXT