मुंबई

रायगड जिल्ह्यात आदिवासी महिलांची पहिली मच्छिमार सहकारी संस्था स्थापन

CD

रायगड जिल्ह्यात आदिवासी महिलांची पहिली मच्छीमार सहकारी संस्था स्थापन
साळोख धरण परिसरातील महिलांचा ऐतिहासिक विजय
कर्जत, ता. ११ (बातमीदार) ः कर्जत तालुक्यातील कळंबजवळील साळोख धरण परिसरात आदिवासी महिलांनी एक ऐतिहासिक पाऊल उचलत जिल्ह्यातील पहिली आदिवासी महिलांची मच्छीमार सहकारी संस्था स्थापन केली आहे. विशेष म्हणजे ही जिल्ह्यातील आदिवासी महिलांची पहिलीच नोंदणीकृत मच्छीमार संस्था असून, तिचे संपूर्ण नेतृत्व आणि व्यवस्थापन महिलांच्याच हाती राहणार आहे.
कोकण विभागातील ठाणे-रायगड सीमाभागातील नारळाची वाडी आणि फोड्याची वाडी येथे कातकरी व ठाकर आदिवासींचा मोठा वावर आहे. उपजीविकेसाठी या समुदायाला मासेमारी, शेती, भाजीपाला लागवड आणि जंगलातील नैसर्गिक उत्पन्नावर आजही मोठा आधार आहे. अनेक महिला दर आठवड्याला ९० ते १०० किलोमीटरचा प्रवास करून मुंबईत जंगलातील उत्पादने विक्रीस नेतात.
१९८४मध्ये बांधलेल्या साळोख धरणातील मासेमारीची निविदा वर्षानुवर्षे बाहेरील कंत्राटदारांना दिली जात होती. स्थानिक आदिवासींना प्राधान्य न मिळाल्याने महिलांना हक्काच्या जलस्रोतामध्येही लपूनछपून मासेमारी करावी लागत होती. पकडले जाणे, अपमानास्पद वागणूक आणि कंत्राटदारांकडून होणारा त्रास हा त्यांच्या रोजच्या जीवनाचा भाग बनला होता. या अन्यायाविरुद्ध स्थानिक नेत्या सुनीता कांबडी, निसर्ग सामाजिक संस्था आणि कोरो इंडिया यांनी एकत्रित प्रयत्न सुरू केले. तब्बल ११ महिन्यांच्या सततच्या बैठका, लोकजागृती, लोकवाटा जमा करणे आणि प्रशासकीय अडचणींवर मात केल्यानंतर अखेर संस्थेची अधिकृत नोंदणी पूर्ण झाली. २६ जानेवारी प्रजासत्ताकदिनानिमित्त धरणात मासे सोडून मत्स्य पुनर्भरणाचा कार्यक्रम पार पडला. याच दिवशी ‘जिजाऊ मच्छीमार सहकारी संस्था’ला तलाव ठेका मिळाल्याचा अधिकृत नोटीस फलक धरण परिसरात लावण्यात आला.


परंपरा पुन्हा दृढ करण्याचा हेतू
कातकरी आणि ठाकर समुदायांची सामूहिक संसाधन व्यवस्थापनाची परंपरा पुन्हा दृढ करण्याचा संस्थेचा हेतू आहे. जमीन, जंगल, जल या तिन्ही घटकांच्या एकत्रित उपजीविका मॉडेलचे पुनरुज्जीवन करण्यासाठी जिजाऊ संस्था कार्यरत राहणार आहे. स्थानिक आदिवासी महिलांनी आपल्या हक्कासाठी उभे राहून मिळवलेला हा विजय केवळ रोजगाराचे साधन निर्माण करणारा नसून सन्मान, स्वावलंबन आणि लोकशाही मूल्यांचे प्रतीक ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात; चार वेळा कार झाली पलटी, चालक जागीच ठार, गाडीचे दरवाजे कापून मृतदेह काढला बाहेर

Trimbakeshwar Land Acquisition : "कवडीमोल दरात जमिनी नकोत!" त्र्यंबकेश्वरच्या शेतकऱ्यांचा कुंभमेळा कामांना विरोध

Latest Marathi News Live Update : पुणे जिल्हा नियोजन समितीची आज पहिली बैठक

Aquarius Mahayog: कुंभ राशीत तयार होतोय दुर्लभ महायोग! ‘या’ राशींसाठी धोक्याची घंटा? जाणून घ्या संपूर्ण भविष्य

Nagpur News: सीईओ साहेब, केवळ एक सही द्या हो! शेकडो दिव्यांग विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ; जी. आर.चा फटका

SCROLL FOR NEXT