मुंबई

‘यार्न’ प्रकल्प प्रदूषणविरहित

CD

‘यार्न’ प्रकल्प प्रदूषणविरहित
कंपनी व्यवस्थापनाची प्रशासनाला लेखी हमी
पालघर, ता. ११ ः पालघर तालुक्यातील टोकराळे येथे रिलायन्स टेक्सटाईल प्रकल्प उभा राहणार आहे. या उद्योगामुळे प्रदूषण होऊन पर्यावरणाला बाधा पोहोचणार असल्याची अशी भावना जनमानसात होती. मात्र, प्रकल्पातून कोणत्याही प्रकारचे प्रदूषण किंवा सांडपाणी सोडले जाणार नाही, अशी हमी रिलायन्स प्रकल्प व्यवस्थापनाने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाला एका पत्राद्वारे दिली आहे.
केळवे रोड टोकराळे परिसरामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीमार्फत ८५० एकर जमिनीवर हा प्रकल्प उभा राहणार आहे. या प्रकल्पासाठी अधिग्रहणाचे काम औद्योगिक विकास महामंडळामार्फत प्रगतीपथावर आहे. तर कंपनीच्या प्राथमिक टप्प्यातील कामांसाठी देखरेखीसाठी कंटेनर केबिन आणले होते. या प्रकल्पासाठी वीज प्राप्त व्हावी, या दृष्टिकोनातून महावितरण विभागाकडे कंपनीने मागणी केली आहे. तसेच प्रस्तावित प्रकल्पामध्ये कोणत्याही प्रकारचे कापड उत्पादन होणार नसून शून्य सांडपाणी विसर्जन आधारित तंत्रज्ञान वापरले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
---------------------------
रोजगाराच्या संधी
रिलायन्सच्या सामाजिक उत्तरदायित्व विभागामार्फत प्रकल्प परिसरातील गावांमध्ये आवश्यक असलेल्या सामाजिक कामांसाठीचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. तर काही बाबींचे सर्वेक्षण सुरु आहे. यासह कंपनीमार्फत स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी प्राप्त करून दिल्या जाणार आहेत. त्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम तरुणांसाठी राबवला जाणार असल्याचे प्रकल्पाचे वरिष्ठ उपाध्यक्ष दिलीप सावंत यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: पाकिस्तानच्या बहिष्काराच्या निर्णयावेळी कसे होतं भारताच्या ड्रेसिंग रुमधील वातावरण? प्रशिक्षकांनी केला खुलासा

Ankita Bhandari Murder: खरे पीडित अंकिताचे आई वडीलच, बाकी फक्त राजकारण करतायत! मुख्यमंत्री भावूक; म्हणाले, गुन्हेगारांना सोडणार नाही

Nirmala Sitharaman : काँग्रेसने देश विकून शेतकऱ्यांना फसविले; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा आरोप

Latur Airport: लातूर विमानतळ ‘धावपट्टीचे ऑडिट करा’; पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजेंनी विमानतळ विकास कंपनीला फटकारले!

Vishwa Marathi Sammelan : अखेर मुहूर्त ठरला! कुसुमाग्रजांच्या स्मृती दिनी नाशिकमध्ये भरणार 'विश्व मराठी संमेलन'

SCROLL FOR NEXT