मुंबई

धावपटूंची सुवर्णकामगिरी

CD

ठाण्याच्या धावपटूंची सुवर्णकामगिरी

ठाणे, ता. ११ (बातमीदार) : महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स संघटनेतर्फे कोपरगाव येथे आयोजित कनिष्ठ गटाच्या राज्य अजिंक्यपद ॲथलेटिक्स स्पर्धेत ठाणे जिल्ह्याच्या खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन केले. ट्रॅक अँड फिल्ड मास्टर्स संघाचा जिहांश पाटील याने स्पर्धेत दुहेरी सुवर्णपदक पटकावत सर्वांचे लक्ष वेधले. ५० मीटर धावण्याच्या शर्यतीत त्याने ७.३२ सेकंद अशी वेळ नोंदवत १५ दिवसांपूर्वीच केलेला ७.५ सेकंदांचा स्वतःचाच जिल्हा विक्रम मोडीत काढला. यानंतर १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत १४.२८ सेकंद अशी वेळ देत दुसरे सुवर्णपदक आपल्या नावे केले.
कनिष्ठ गटातील ५० मीटर शर्यतीत हृदित्य कवीश्वरने ८.७८ सेकंदात अंतर पूर्ण करत अव्वल क्रमांक पटकावला. मुलींच्या १०० मीटर शर्यतीत काश्वी करंजकर हिने १५.७ सेकंद अशी वेळ नोंदवत रौप्यपदक जिंकले; मात्र अवघ्या ०.०१ सेकंदाने सुवर्णपदक हुकले. अवघ्या सहा महिन्यांपासून सराव सुरू केलेल्या त्रिशा गालाने १०० मीटर शर्यतीत १७.८३ सेकंदासह कांस्यपदक मिळवले. ठाण्याच्या या खेळाडूंनी राज्यस्तरावर झळकावलेल्या कामगिरीमुळे जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train: प्लॅटफॉर्मवर पाऊल टाकताच जीव धोक्यात! मुंबईतलं 'हे' स्थानक बनलंय मृत्यूचा अड्डा? चार वर्षांची हादरवणारी कहाणी

Accident News: भीषण अपघातात भावाचा जागीच मृत्यू; बारावीचा पेपर देऊन बहिणीला घरी नेताना घटना, आई-वडीलांचा आक्राेश!

Nagpur Accident: पिकअपच्या धडकेत महिलेचा मृत्यू; पती गंभीर तुमसर-रामटेक मार्गावरील घटना

T20 World Cup Ind vs Namibia : मोठ्या विजयाचे भारताचे ध्येय; नामिबियाविरुद्ध अभिषेक शर्मा मुकण्याची शक्यता

Maharashtra political news : ‘राष्ट्रवादी’च्या विलीनीकरणाला खो! दिल्लीतील दोन मोठ्या नेत्यांच्या सल्ल्यानंतरच निर्णय

SCROLL FOR NEXT