हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते ज्योती चौधरी यांच्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन
विरार, ता. ११ (बातमीदार) : वसईच्या महिला चित्रकार ज्योती चौधरी मलिक यांच्या चित्रांचे भव्य प्रदर्शन मुंबईतील जहांगीर कलादालनात ९ ते १५ फेब्रुवारी या कालावधीत भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते झाले. या वेळी इतिहास व भाषातज्ज्ञ ॲड. प्रदीप सामंत उपस्थित होते.
कोणतेही औपचारिक कलाशिक्षण न घेता ज्योती चौधरी यांनी चिकाटीने चित्रकलेत आपले स्थान निर्माण केले आहे. त्या अॅक्रेलिक व जलरंग माध्यमांतून चित्रनिर्मिती करतात. त्यांच्या चित्रांत महिलांचे भावविश्व प्रभावीपणे साकारले असून, त्या दुबळ्या न वाटता सृजनशील, कर्तृत्ववान आणि धैर्यवान रूपात दिसून येतात.
ज्योती चौधरी यांनी देशभरातील अनेक चित्रप्रदर्शनांत सहभाग घेतला असून, २०२५मध्ये मणिकर्णिका आर्ट गॅलरीकडून त्यांना सुवर्णपदकाने गौरविण्यात आले आहे. उद्घाटनप्रसंगी हितेंद्र ठाकूर यांनी वसईच्या मातीतील कलाकार मुंबईत प्रदर्शन भरवून वसईचे नाव उज्ज्वल करीत आहे, याचा अभिमान वाटतो, असे गौरवोद्गार काढले. हे प्रदर्शन १५ फेब्रुवारीपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्व प्रेक्षकांसाठी खुले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.