मुंबई

फळ बाजारात कचऱ्याचा विळखा

CD

फळ बाजाराला कचऱ्याचा विळखा
अस्वच्छता, दुर्गंधी आणि अपघाताचा धोका; व्यापारी-ग्राहक त्रस्त
तुर्भे, ता. १२ (बातमीदार) : वाशीतील फळ बाजारात कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून संपूर्ण बाजार परिसरात अस्वच्छतेचे चित्र दिसून येत आहे. कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने व्यापाऱ्यांच्या गाळ्यांबाहेर, वाहनांच्या खाली आणि बाजारातील रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग साचले आहेत. सडलेल्या फळांमधून येणारी तीव्र दुर्गंधी, त्यातून वाहणारे सांडपाणी तसेच पुठ्ठे, पेंढा व प्लॅस्टिकसारखा ज्वलनशील कचरा यामुळे बाजारातील वातावरण दूषित झाले आहे.
फळ बाजारात दररोज मोठ्या प्रमाणावर फळांची आवक होते. सध्या तापमान वाढत असल्याने फळे लवकर पिकून खराब होण्याचे प्रमाण वाढले असून त्यातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाणही लक्षणीय वाढले आहे. आंबा हंगाम अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झालेला नसतानाही ही स्थिती असल्याने, हंगामाच्या भरात परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सडलेल्या फळांमधून निघणाऱ्या द्रवामुळे बाजारातील रस्ते चिकट व घसरडे झाले असून अपघाताचा धोका वाढला आहे. याशिवाय दिवसभर पडून राहणारा ज्वलनशील कचरा आग लागण्याच्या धोक्याला आमंत्रण देत आहे. यापूर्वी अशा कचऱ्यामुळे आगीच्या घटना घडल्याची नोंद असल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
बाजारात कचरा टाकण्यासाठी पुरेशा कचराकुंड्यांची व्यवस्था नसल्याने कचरा थेट गाळ्यांसमोर किंवा वाहनांखाली टाकला जात असल्याची तक्रार व्यापाऱ्यांनी केली आहे. त्यामुळे ग्राहकांना कचऱ्यातून वाट काढत खरेदी करावी लागत आहे.


कायमस्वरूपी उपायांची गरज
पावसाळ्यात नियमित कचरा उचलला जात होता; मात्र सध्या साफसफाईकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. बाजार समिती प्रशासनाने कचरा व्यवस्थापनासाठी ठोस व कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, नियमित कचरा उचलण्याचे वेळापत्रक जाहीर करावे, तसेच बाजार परिसरात पुरेशा कचराकुंड्या उपलब्ध करून द्याव्यात, अशी जोरदार मागणी व्यापारी व संबंधित घटकांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Update : पोलिस भरतीमुळे पाषाण रस्त्यावर वाहतूक बदल, पहाटे चार ते सायंकाळी सहा अंतर्गत रस्ते बंद; १७ फेब्रुवारीपर्यंत अंमलबजावणी

Baramati News : माळेगाव विकास आराखड्यावरून संघर्ष तीव्र; माळेगाव बंद ठेवत प्रशासना विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

Rajpal Yadav's Bail Denied: राजपाल यादवला न्यायालयाकडून धक्का!, जामीन नाकारल्याने तिहार तुरुंगातील मुक्काम वाढणार

Dharashiv News: ७२ लाख ८४ हजाराची अफुची झाडे जप्त,वाशी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी संयुक्त कारवाई

Latest Marathi News Live Update : खासगी क्लासमधील कर्मचाऱ्यांना मारहाण प्रकरण मनसे पदाधिकाऱ्यांना भोवले

SCROLL FOR NEXT