मुंबई

रुग्णालय रद्द करण्याच्या ठरावाला शिवसेनेचा विरोध

CD

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १२ : नेरूळ येथे महापालिकेतर्फे उभारण्यात येत असलेला मल्टिस्पेशालिटी रुग्णालय आणि महाविद्यालयाच्या प्रकल्पाला विरोध करण्याचा ठराव येत्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात येणार आहे. १४ गावातील अपक्ष नगरसेवक भरत भोईर यांनी हा ठराव सादर केला आहे. परंतु हा ठराव बेकायदा असून रद्द करण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी केली आहे. रुग्णालयावर निर्माण झालेल्या वादात आता शिवसेनेने उडी घेतल्यामुळे हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आमदार मंदा म्हात्रे यांनी सरकार दरबारी पाठपुरावा करून रुग्णालय मंजूर केले आहे. या रुग्णालयाला वनमंत्री गणेश नाईक समर्थकांनी जोरदार विरोध केला आहे. हे रुग्णालय ज्या जागेवर होत आहे, त्या जागेवर याआधी क्रिकेटकरिता मैदान राखीव ठेवण्याची मागणी केली होती. तरीदेखील म्हात्रे यांनी सरकार दरबारी पाठपुरावा करित हा प्रकल्प राबवला आहे. या प्रकल्पासाठी महापालिकेने सिडकोला पैसे भरून भूखंड ताब्यात घेतला आहे. या भूखंडावर आता निविदा प्रक्रीया पूर्ण होऊन कामदेखील सुरू होणार आहे. हा प्रकल्प उभारण्याच्या प्रक्रियेत असताना पुन्हा सर्वसाधारण सभेत प्रकल्प रद्द करण्याचा ठराव भरत भोईर यांनी मांडला आहे. मुळात हा ठराव बेकायदा असल्याचा दावा नगरसेवक किशोर पाटकर यांनी केला आहे.

नियमानुसार अंमलबजावणी, जमीन व्यवहार, निविदा व करार प्रक्रिया ही कार्यकारी अधिकारात मोडणारी बाब असून सर्वसाधारण सभेला अधिकार नाहीत, असा दावा पाटकर यांनी केला आहे. या व्यतिरिक्त महापालिकेला कोणताही ठराव जनहितविरोधी बेकायदा अथवा अधिकार मर्यादेबाहेरचा असल्याच स्थगित अथवा रद्द करण्याचा अधिकार राज्य सरकारला प्रदान केला आहे. त्यामुळे हा ठराव रद्द करण्याची मागणी पाटकर यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : भारताचा सर्वात मोठा विजय, ९३ धावांनी नामिबियाला नमवले; पाकिस्तानला चेपले, रविवारी IND vs PAK मध्ये Super 8s चा फैसला

IND vs NAM : भारतीय संघावर 'Fixing' चा आरोप! इशान किशनच्या विकेटवरून पाकड्यांनी वाद पेटवला, नेमकं काय घडलं?

Imran Khan Jail Torture : इम्रान खान यांचा तुरुंगात छळ सुरू ; एक डोळा पूर्णपणे निकामी होण्याच्या मार्गावर!

Education Reform : विद्यापीठांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत का ? सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांचा सवाल

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT