मुंबई

शासकीय निविदा प्रक्रियेतील सहभागी अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण

CD

शासकीय निविदा प्रक्रियेतील सहभागी अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण
पुणे, ता. २४ ः महानिविदा संकेतस्थळावर निविदा प्रसिद्ध/फ्लॅश करणे याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करणारे खास अधिकाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेले प्रशिक्षण ३१ ऑगस्ट रोजी आयोजिले आहे. प्रशिक्षणात विविध संकेतस्थळांचा समावेश करण्यात आला आहे. शासकीय निविदा प्रक्रियेत सहभागी असणारे अधिकारी, ग्रामसेवक, संगणक ऑपरेटर, सरकारी कंत्राटदार, स्थापत्य अभियंते व इतर संबंधित अधिकारी यांच्यासाठी प्रशिक्षण उपयुक्त आहे. प्रशिक्षणात निविदा नोटीसची तयारी, निविदा प्रकाशित करण्यासाठी लागणारी कागदपत्रे, संगणक सेटिंग, सॉफ्टवेअर इंस्टॉलेशन, प्री बीड मीटिंग, निविदा उघडण्याची प्रक्रिया, वर्क ऑर्डर इत्यादी बाबींचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
संपर्क : ९३५६९७३४२७

वास्तुशास्त्र नियोजनाविषयी कार्यशाळा
वास्तुशास्त्रानुसार घर, ऑफिस वा दुकान कसे असावे इ. बाबत माहिती करून देणारी ऑनलाइन कार्यशाळा ८ सप्टेंबरपासून आयोजिली आहे. घर, वास्तू दोषमुक्त असावी ही इच्छा बाळगणाऱ्या सर्वांसाठी कार्यशाळा उपयुक्त आहे. कार्यशाळेत वास्तुशास्त्र काय आहे, वास्तुदोष कोणते आहेत, त्याचे परिणाम कोणाला जाणवतात, दिशा, उपदिशा, अधिपती देवता आणि पंचतत्त्व, दिशा आणि प्रभाव, वास्तुपुरुष मंडल, मर्मस्थान, उपमर्मस्थान, जमीन कशी निवडावी, घर नक्की कोठे व कसे बांधले पाहिजे, घर बांधण्यास प्रारंभ कसा करावा, घरातील अंतर्गत रचना कशी असावी, मुख्य दरवाजाची दिशा ओळखणे, दरवाजा कोठे करावा, वास्तूचे आयुष्य आदींबाबत मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ९३५६९७३४२७

होम गार्डनिंग कार्यशाळा
घराच्या आजूबाजूला उपलब्ध असणाऱ्या जागेमध्ये गार्डनची निर्मिती कशी करावी. यामध्ये गार्डनचे वेगवेगळे प्रकार जसे की, किचन गार्डन औषधी वनस्पतींचे गार्डन, अँटिडायबेटिक गार्डन, गार्डन उभारणीची तत्त्वे, गार्डनमधील रंग संकल्पना, बाल्कनी गार्डन, टेरेस गार्डन, भिंतीवरती केले जाणारे व्हर्टिकल गार्डन, इनडोअर गार्डन यावर मार्गदर्शन करणारी ऑनलाइन कार्यशाळा १५ सप्टेंबर रोजी आयोजिली आहे. घरामधील कचऱ्याचे नियोजन करून त्यापासून कंपोस्टची निर्मिती. घरगुती खते बनवण्याच्या पद्धती ज्या आपल्याला आपल्या गार्डनमध्ये वापरता येतील. तसेच गार्डनची काळजी कशी घ्यावी, पाणी व खताचे नियोजन रोग व किडींचे नियंत्रण आदींबाबत माहिती दिली जाणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhya Pradesh Congress: मध्य प्रदेशच्या राजकारणात खळबळ! कमलनाथ यांनी केला गौप्यस्फोट, म्हणाले..

Mohol News : शेततळ्यात पाय घसरून पडून विवाहितेचा मृत्यू

Latest Marathi News Updates: वेळ पडली तर गेवराईतून निवडणुकीला उभं राहणार- हाके

गणेशोत्सव निर्विघ्न पार पडण्यासाठी पोलिसांचा अ‍ॅक्शन मोड, प्रत्येक घडामोडीवर करडी नजर; 'असा' असेल प्लॅन

Maratha Reservation : मुंबई आंदोलनासाठी मंगळवेढ्यातून तिघांची सायकलवारी

SCROLL FOR NEXT