मुंबई

युट्यूब, इन्स्टाग्रामसह वाढवा व्यवसाय

CD

यूट्युब, इन्स्टाग्रामसह वाढवा व्यवसाय
पुणे, ता. १३ : स्वतःचा उद्योग, व्यवसाय, व्यापाराला पुढील स्तरावर नेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी उपयुक्त असणारी ऑनलाइन कार्यशाळा १५ सप्टेंबरला आयोजिली आहे. कार्यशाळेत स्वतःच्या उद्योग-व्यवसायाचा ब्रँड वाढवण्यासाठी यूट्युब आणि इन्स्टाग्राम कसे वापरायचे, प्लॅटफॉर्म अल्गोरिदम, ट्रेंड आणि सामग्री निर्मिती (कन्टेन्ट क्रिएशन) समजून घेऊन शूटिंग, संपादन (एडिटिंग) आणि अपलोडिंग कसे करायचे, याबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात येणार आहे. उत्पादन टॅगिंगद्वारे पैसे कसे कमवायचे आणि ब्रँड व्हॅल्यू कशी वाढवायची, विविध यशोगाथा आणि भविष्यातील ट्रेंडपासून प्रेरणा कशी घ्यायची, याबाबतही उपयुक्त माहिती दिली जाणार आहे. स्वतःच्या व्यवसायाची ऑनलाइन माध्यमांचा वापर करून भरभराट करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी मिळवून देणारी ही कार्यशाळा असणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

कॅफे व्यवसाय कार्यशाळा
कॅफे हा फक्त खाण्यापिण्याचा व्यवसाय नाही, तर तो आजच्या तरुणाईसाठी लाइफस्टाइल झाले आहे. कॉलेज कॅम्पसपासून शॉपिंग मॉलपर्यंत सर्वत्र कॅफे संस्कृती झपाट्याने वाढताना दिसते. अशा परिस्थितीत स्वतःचा कॅफे सुरू करायचा असेल, तर व्यावसायिक दृष्टिकोनातून काय प्रयत्न केले पाहिजेत, याबाबत मार्गदर्शन करणारी कार्यशाळा २० व २१ सप्टेंबरला आयोजिली आहे. कार्यशाळेत पिझ्झा, बर्गर, सँडविच, पास्ता, नाचोज, फ्रेंच फ्राईज अशा लोकप्रिय पदार्थांचा प्रत्यक्ष डेमो दिला जाणार आहे. त्याचबरोबर मिल्कशेक व मॉकटेल्स कसे तयार करावे तसेच मोजीतो व इतर थंडगार ड्रिंक्स कसे सर्व्ह करायचे याचे कौशल्यही या कार्यशाळेत दिले जाणार आहे. खास बाब म्हणजे कॅफे मॉडेल सेटअप आणि डेकोरेशन आयडियाज, ग्राहकांना आकर्षित करणारे इंटिरियर, किचन मॅनेजमेंट तसेच व्यावसायिक पातळीवर कॅफे कसा यशस्वी करावा, यावरही मार्गदर्शन मिळणार आहे. प्रत्यक्ष अनुभवासाठी कॅफेला भेट आयोजिली आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

४० प्रकारचे चहा व व्यवसाय संधी
कुठल्याही ब्रँडचा आधार न घेता स्वतःच्या हिमतीवर चहा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ४० प्रकारच्या चहाचे प्रशिक्षण २७ व २८ सप्टेंबरला आयोजिले आहे. यामध्ये चहाचे ४० प्रकार प्रात्यक्षिकासह शिकवण्यात येतील तसेच मोठ्या प्रमाणात ऑर्डर घेऊन ऑनलाइन व्यावसायिक चहा विक्री कशी करायची, चहा क्षेत्रात स्वतःचा ब्रँड कसा उभा करायचा, चहाची विक्री कशी वाढवायची, याबाबत मार्गदर्शन होईल. या प्रशिक्षणानंतर थेट व्यवसाय उभे करण्याची व स्वतःच्या कॅफे, हॉटेल, रेस्टॉरंट इत्यादी आस्थापनांची चहा विक्री वाढवण्याची संधी उपलब्ध होईल.
संपर्क : ८४८४८११५४४

दिवाळी फराळ व्यवसाय संधी
चटपटीत व स्वादिष्ट असा दिवाळी फराळ घरच्या घरी सोप्या पद्धतीने व झटपट बनवण्यास शिकवणारी तसेच याला व्यावसायिक रूप कसे द्यावे, यातून घरगुती दिवाळी फराळाचा व्यवसाय कसा सुरू करावा याबाबतही योग्य ते मार्गदर्शन करणारी कार्यशाळा २७ सप्टेंबरला आयोजिली आहे. कार्यशाळेत रवा लाडू, बेसन लाडू (पाकाच्या प्रात्यक्षिकासह), चकली, चिरोटे, करंजी, कोल्हापुरी पुडाची वडी, शेव व शेवचे इतर प्रकार, पुणेरी बाकरवडी, तळीव चिवडा, पौष्टिक चिवडा, गुलमोहर चिवडा, गोड व खारे शंकरपाळे, बालुशाही व इतर असे दिवाळी विशेष फराळाचे प्रकार प्रात्यक्षिकांसह शिकवण्यात येणार आहेत. पदार्थ रुचकर होण्यासाठी विविध टिप्स व सर्व पदार्थांच्या नोट्सही दिल्या जातील.
संपर्क : ८४८४८११५४४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed: गरोदर महिलेच्या पोटात ३० तास मृत बाळ; उपचारासाठी चालढकल, बीडमध्ये गंभीर प्रकार

India Pakistan Cricket Match: भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या 'त्या' नववधुने केलं मोठं विधान!

Pro Kabaddi 12: पवन सेहरावतची हकालपट्टी! तमिळ थलायवाजने कर्णधाराला घरी पाठवण्याचं दिलं स्पष्टीकरण

Asia Cup 2025: बीसीसीआय भारत-पाकिस्तान सामना रद्द करू शकतं का? नेमका नियम काय आहे? वाचा...

Latest Marathi News Updates : मोदींच्या एआय व्हिडीओमुळे पुण्यात भाजपचं आंदोलन

SCROLL FOR NEXT