मुंबई

किचन गार्डन कार्यशाळा

CD

किचन गार्डन कार्यशाळा
पुणे, ता. ५ : किचन गार्डनद्वारे भाजीपाला, सक्युलन्ट्स व कॅक्टस, फॉलिएज व फुलझाडांची तसेच इतर फळझाडांची लागवड करता येते. रोजच्या खाण्यात ताजा आणि विषमुक्त भाजीपाला व शोभेची झाडे घरच्या घरी कशी लावू शकतो याविषयी सखोल मार्गदर्शन करणारी कार्यशाळा १३ जुलैला आयोजिली आहे. घरातल्या घरात लागवड केलेल्या सेंद्रिय भाज्यांचे आरोग्यदायी फायदे, शिवाय वर्षभर बाग फुललेली कशी राखावी, बागेचे आर्थिक गणित कसे बसवावे, बागेचे नियोजन व डिझाइन, रोपांची निवड, माती व मातीविरहित लागवड करण्याची पद्धत, खत व पाणी व्यवस्थापन, रोग व कीड नियंत्रणाविषयी माहिती दिली जाणार आहे. राष्ट्रीय पातळीवर काम करणारे अनुभवी तज्ज्ञ कार्यशाळेला मार्गदर्शन करणार आहेत.
संपर्क : ८४८४८११५४४

सरकारी इस्टिमेशन प्रशिक्षण
शासकीय कामांचे मूल्यनिर्धारण, इस्टिमेशन हे बांधकाम, स्थापत्य विभागातील, कॉन्ट्रॅक्टर, विद्यार्थ्यांना उपयुक्त असे प्रशिक्षण १९ व २० जुलैला आयोजिले आहे. यात पीडब्ल्यूडी, एसएसआर, रेट, नियमावली, टेस्टिंग, मेजरमेन्ट शीट, रेट तपासणी, चार्ट, इस्टिमेशन सॉफ्टवेअर व इस्टिमेशन बनविणे, समाज मंदिर, सभामंडप, शाळा, अंगणवाडी, सुरक्षा भिंत अशा प्रकारची कामे व इस्टिमेशनबाबत मार्गदर्शन करण्यात येईल.
संपर्क : ९३५६९७३४२७

व्हिडिओ एडिटिंग कार्यशाळा
स्वतःच्या यूट्युब चॅनेलवरती अथवा इन्स्टाग्राम व इतर प्लॅटफॉर्मसाठी व्हिडिओ तयार करण्यासाठी तो रेकॉर्ड करणे व एडिट करणे गरजेचे आहे. अनेकदा व्हिडिओ रेकॉर्ड केला जातो, मात्र तो एडिट करताना अडचण निर्माण होते. या पार्श्वभूमीवर चार दिवसांच्या व्हिडिओ एडिटिंग कार्यशाळेचे आयोजन १९, २० तसेच २६, २७ जुलैला केले आहे. या कार्यशाळेचा उद्देश व्हिडिओ एडिटिंग कौशल्यांसह सहभागींना सक्षम करणे हा आहे. कार्यशाळेत एडिटिंगचे महत्त्व, वंडरशेअर फिल्मोरा १२ व इनशॉट या दोन एडिटिंग साधनांचा वापर करून तसेच विविध एआय टूल वापरून एडिटिंग कसे करावे, स्मार्ट एडिटिंगचे तंत्र, टाइमलाइनमध्ये क्लिप कट करणे, व्हिडिओमध्ये मजकूर व संगीत जोडणे, आवाजाचे एडिटिंग, ग्रीन स्क्रीन व क्रोमा कीइंग इफेक्ट, वेगवेगळे फिल्टर लावणे, मोशन ग्राफिक्स आणि व्हिज्युअल इफेक्ट्स, ऑडिओ ॲडजेस्टमेंट व व्हॉइस ओव्हर, स्मार्टफोन वापरून लक्षवेधी व्हिडिओ तयार करण्यासाठीच्या टीपा या विषयांवर प्रात्यक्षिकांसहित मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Warren Buffett: वॉरेन बफेंसारखी गुंतवणूक करायला शिका; कमवाल करोडो रुपये, काय आहे त्यांची स्ट्रॅटेजी?

HBD MS Dhoni: एमएस धोनीच्या नावावर असलेले असे ५ रेकॉर्ड जे मोडणं कोणालाही आहे महाकठीण

Chandrakant Patil: पुणे पोलिस दलात लवकरच एक हजार जणांना घेणार; चंद्रकांत पाटील यांची माहिती

11th Class Admission: अकरावीच्या प्रवेशासाठी आज अखेरची संधी; ३२ हजार विद्यार्थ्यांनी निश्चित केला प्रवेश

Solapur News: 'मुख्यमंत्र्यांसमवेत कल्याणशेट्टी अन्‌ मानेंची चर्चा'; माजी खासदार थांबले काही अंतरावर, नेमकं काय घडलं..

SCROLL FOR NEXT