कुल्फी-आईस्क्रीम पार्लर व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळा
पुणे, ता. २० : स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या नवउद्योजकांसाठी ‘डेअरी व कुल्फी-आईस्क्रीम पार्लर व्यवसाय प्रशिक्षण’ या विषयावरील कार्यशाळा २४ व २५ जानेवारीला आयोजिली आहे. कार्यशाळेत डेअरी व्यवसायाची ओळख, दूध, दही, ताक, लोणी, पनीर यांचे बाजारमूल्य, स्थानिक ग्राहकांच्या गरजा, तसेच कुल्फी व आईस्क्रीम व्यवसायाची माहिती, मावा कुल्फी, फ्रूट कुल्फी, स्टिक, कप व कोन आईस्क्रीमचे प्रकार, हंगामी व कायमस्वरूपी विक्री मॉडेल, कच्चा माल, मशिनरी आणि कायदेशीर नोंदणी प्रक्रियेवर मार्गदर्शन होणार आहे. तसेच पार्लर सेटअप, जागा निवड, डिझाइन, स्वच्छता व अन्न सुरक्षा नियम, खर्च व नफा गणित, विक्री दर ठरवणे, तसेच स्थानिक व डिजिटल मार्केटिंगविषयी माहिती दिली जाणार आहे. याशिवाय फ्रँचायझी, केटरिंग, कुल्फी सायकल कार्ट व स्वतःचा ब्रँड उभारण्याच्या संधींबाबतही माहिती दिली जाईल.
ॲमेझॉनवर विका स्वतःची उत्पादने
ॲमेझॉनवर उत्पादन विकायचे असेल तर त्याची प्रक्रिया काय आहे, नोंदणी कशी करावी, कागदपत्रे, किती दिवस लागतात, हे सर्व करून बिझनेस कसा वाढवायचा, ॲमेझॉनवर विक्री करण्यास किती खर्च लागतो, सेलर पोर्टल कसे असायला हवे आदींबाबत प्रात्याक्षिकासह मार्गदर्शन करणारी ऑनलाइन कार्यशाळा ३१ जानेवारीला आयोजिली आहे. कार्यशाळेत उत्पादन कसे लिस्ट करावे, डिलिव्हर करावे, रिटर्न्स असतील तर ते कसे हाताळावे, ॲमेझॉन ॲपवरती उत्पादन जास्तीत जास्त कसे दिसतील जेणेकरून विक्री वाढेल, सवलती कशा ठेवायच्या, उत्पादन स्पॉन्सर कसे करायचे, पेमेंट कसे पाहायचे, सपोर्ट कसा घ्यायचा याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
व्यावसायिक पापड प्रशिक्षण
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सगळीकडे पापड तयार करण्यात येत असतात. सध्याच्या धावपळीच्या जीवनात सर्वांनाच पापड तयार करण्याच्या वेळ जास्त लागणाऱ्या प्रक्रियेतून जायचे नसते व ते बाहेरून पापड विकत घेण्यास प्राधान्य देतात. त्यामुळेच व्यावसायिकरीत्या पापड तयार करणे व विक्री करणे हा व्यवसाय फायद्याचा ठरत आहे. या पार्श्वभूमीवर व्यावसायिक पापड प्रशिक्षणाचे आयोजन ३१ जानेवारी व १ फेब्रुवारीला केले आहे. यामध्ये उडीद पापड, नाचणी पापड, ज्वारी पापड, बाजरी पापड, शेवगा पापड, मेथी पापड, पालक पापड, टोमॅटो पापड, पोह्याचे पापड, राजस्थानी स्पेशल खिचिया पापड, कोल्हापुरी हंडी पापड, उपवासाचे शाबू बटाटा पापड व शाबूचे पापड, तिखट सांडगे, खारोड्या, पापड आटा, पापड मसाला इत्यादी नावीन्यपूर्ण पापड शिकवले जाणार आहेत. त्याचबरोबर पापड व्यवसायातून मिळणारा नफा, मशिनरी, कमीत कमी गुंतवणुकीमध्ये जास्तीत जास्त नफा देणारा व्यवसाय कसा उभारावा याबाबत मार्गदर्शन होणार आहे.
एआय-आधारित बिझनेस अॅनालिसिस कार्यशाळा
आजच्या डिजिटल युगात डेटा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करून व्यवसाय निर्णय अधिक अचूक आणि जलद घेता येत आहेत. याच पार्श्वभूमीवर एआय-आधारित बिझनेस अॅनालिसिसवरील ६० तासांची ऑनलाइन विशेष प्रशिक्षण कार्यशाळा आयोजिली आहे. कार्यशाळेत पारंपरिक बिझनेस अॅनालिसिस आणि एआय-आधारित अॅनालिसिसमधील फरक स्पष्ट केला जाणार आहे. डेटा संकलन, विश्लेषण, ट्रेंड ओळखणे, अंदाज, निर्णयप्रक्रिया आणि व्यवसाय धोरण आखणीसाठी एआय टूल्सचा वापर कसा करायचा, यावर सविस्तर मार्गदर्शन दिले जाईल. तसेच मार्केट अॅनालिसिस, ग्राहक वर्तन समजून घेणे, खर्च-नफा विश्लेषण, रिस्क मॅनेजमेंट आणि परफॉर्मन्स मोजमापासाठी एआय कसा उपयुक्त ठरतो, हे प्रत्यक्ष उदाहरणांद्वारे समजावले जाणार आहे. कार्यशाळेमुळे सहभागींची विश्लेषण क्षमता वाढेल, डेटा-आधारित निर्णय घेण्याचा आत्मविश्वास निर्माण होईल आणि करिअर तसेच व्यवसाय वृद्धीसाठी नवीन संधी उपलब्ध होतील.
संपर्क : ८४८४८११५४४, ८९५६३४४४७२, ८९५६३४४४७१, ९३५६९७३४२७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.