मुंबई

गृहनिर्माण संस्था व्यवस्थापन प्रशिक्षण

CD

गृहनिर्माण संस्था व्यवस्थापन प्रशिक्षण
पुणे, ता. ८ : सोसायटी मॅनेजर या करिअर संधीविषयीचे तीनदिवसीय प्रमाणपत्र प्रशिक्षण एसआयआयएलसी आणि पुणे हाउसिंग फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने २०, २१ व २२ फेब्रुवारीला आयोजिले आहे. यामध्ये सोसायटी मॅनेजरची कर्तव्ये, प्रोफाइल आणि जबाबदाऱ्या, मॅनेजिंग कमिटी अजेंडा व मिनिट्स लेखन, गृहनिर्माण संस्थेतील शेअर्स आणि व्याजाचे हस्तांतर, देखभाल बिले तयार करणे, टीडीएस भरणे, ऑडिटसाठी चेकलिस्ट, लेखापरीक्षण अहवाल, वार्षिक विवरणपत्र आदी विषयांचा समावेश आहे. प्रशिक्षणार्थींना प्रात्यक्षिक अनुभवाची संधीही दिली जाणार आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यास गृहनिर्माण संस्थांमध्ये सोसायटी व्यवस्थापक म्हणून करिअर संधी उपलब्ध होऊ शकते अथवा गृहनिर्माण संस्थांना विविध सेवा देऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो.

एनजीओ नोंदणीबाबत प्राथमिक, प्रगत प्रशिक्षण
विविध कामांसाठी स्वयंसेवी संस्था अर्थात ‘एनजीओ’ना प्राधान्य दिले जाते. याद्वारे विकास, व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतात. अशा स्वयंसेवी संस्थेची स्थापना, नोंदणी, निधीची उभारणी, कामकाज पद्धती, सीएसआरचे सहकार्य, प्रशासकीय व्यवस्थापन अशा स्वयंसेवी संस्थांशी निगडित माहिती देणारे प्राथमिक प्रशिक्षण २१ फेब्रुवारीला तर प्रगत प्रशिक्षण २२ फेब्रुवारीला आयोजिले आहे. यात संस्थेची स्थापना कशी करावी, प्रशासकीय दस्तऐवजीकरण, धर्मादाय आयोग व इतर सरकारी विभागांशी संपर्क कसा साधावा, प्रस्ताव तयार करणे व सादर करणे, कर्मचाऱ्यांची नियुक्ती, वार्षिक ताळेबंद, अहवाल कसे तयार करावेत, शासकीय योजनांची अंमलबजावणी, कागदपत्रे इ.विषयी मार्गदर्शन होईल.

व्हिडिओ एडिटिंग कार्यशाळा
चार दिवसांच्या व्हिडिओ एडिटिंग कार्यशाळेचे आयोजन २८ फेब्रुवारी व १ मार्च तसेच ७ व ८ मार्चला केले आहे. या प्रशिक्षण कार्यशाळेचा उद्देश व्हिडिओ एडिटिंग कौशल्यांसह सहभागींना सक्षम करणे हा आहे. कार्यशाळेत एडिटिंगचे महत्त्व, वंडरशेअर फिल्मोरा १२ व इनशॉट या दोन लोकप्रिय एडिटिंग साधनांचा वापर करून तसेच विविध एआय टूल वापरून एडिटिंग कसे करावे, स्मार्ट एडिटिंगचे तंत्र, टाइमलाइनमध्ये क्लिप कट करणे, व्हिडिओमध्ये मजकूर व संगीत जोडणे, आवाजाचे एडिटिंग, ग्रीन स्क्रीन व क्रोमा कीइंग इफेक्ट, वेगवेगळे फिल्टर लावणे, मोशन ग्राफिक्स आणि व्हिज्युअल इफेक्ट्स, ऑडिओ ॲडजेस्टमेंट व व्हॉइस ओव्हर, स्मार्टफोन वापरून लक्षवेधी व्हिडिओ तयार करण्यासाठीच्या टिप्सबाबत प्रात्यक्षिकांसहित मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४, ८९५६३४४४७२, ८९५६३४४४७१, ९३५६९७३४२७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zilla Parishad Panchayat Samiti Election result Live Update: माळशिरस तालुक्यातील मांडवे गटात राष्ट्रवादी शरद पवार गटाचा झेंडा

Kolhapur Zilla Parishad : शिरोळमध्ये यड्रावकर गटाला धक्का! दानोळीत राजू शेट्टींनी गड राखला, सातवेत राष्ट्रवादीचा मोठा विजय, राधानगरी तालुक्यात आबिटकरांना पहिला धक्का

Pune ZP, Panchayat Samiti Result : पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीने बहुमताचा आकडा ओलांडला, पुण्यात कुठे कसा निकाल?

Solapur ZP election Results: माजी आमदार राम सातपुतेंची पत्नी विजयी, उत्तम जानकरांच्या मुलाचा पराभव; विधानसभेच्या पराभवाचा वचपा काढला

Kankavli Zilla Parishad Election Results : कणकवलीत शिंदेंच्या शिवसेनेचे वर्चस्व! रफिक नाईक ठरले 'टफ फायटर', पण विजय गुरुप्रसाद शिंदेंचाच; रामचंद्र राऊत तिसऱ्या क्रमांकावर

SCROLL FOR NEXT