आयात-निर्यात व्यवसाय संधी व व्यवस्थापन
पुणे, ता. ९ : आजच्या स्पर्धात्मक आणि जागतिकीकरणाच्या युगात व्यापाराला सीमारेषा राहिलेल्या नाहीत. भारतीय उत्पादने जगभरात पोहोचू शकतात, फक्त योग्य मार्गदर्शन, नियोजन आणि धोरणे असणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर १६ फेब्रुवारीपासून ‘आयात-निर्यात व्यवसाय संधी व व्यवस्थापन’ हे ऑनलाइन प्रशिक्षण आयोजिले आहे. प्रशिक्षणात EXIM धोरण, IncoTerms, शिपिंग आणि कंटेनर व्यवस्थापन, दररचना व आंतरराष्ट्रीय मालवाहतूक, तसेच पॅकेजिंग, लेबलिंग, डिजिटल टूल्स आणि सरकारी योजना यावर अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेल. वाटाघाटी करण्याच्या कौशल्यापासून ते आवश्यक कागदपत्रांची पूर्तता कशी करावी या सर्व बाबींचा प्रशिक्षणात समावेश असणार आहे. स्टार्टअप्स, लघुउद्योजक, व्यापारी आणि नवउद्योजक यांच्यासाठी हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरेल.
४० प्रकारचे चहा व व्यवसाय संधी
भारतात सर्वाधिक लोकप्रिय पेय चहा आहे. चहाच्या व्यवसायात कधीच तोटा सहन करावा लागत नाही, असाही अनेकांचा अनुभव आहे. प्रसिद्ध झालेल्या ब्रँडच्या फ्रॅंचायझी घेऊन व्यवसाय सुरू करण्याकडे सध्या अनेकांचा कल आहे. अमृततुल्यपासून ते गुळाच्या चहापर्यंत असे चहाचे अनेक प्रकार सध्या बघायला मिळत आहेत. प्रत्येकाची चहाच्या चवीची आवडही वेगवेगळी असते. या पार्श्वभूमीवर कुठल्याही ब्रँडचा आधार न घेता स्वतःच्या हिमतीवर चहा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ४० प्रकारच्या चहाचे प्रशिक्षण २१ व २२ फेब्रुवारी रोजी आयोजिले आहे. यामध्ये चहाचे ४० प्रकार प्रात्यक्षिकासह शिकवण्यात येतील तसेच मोठ्या प्रमाणात ऑर्डर घेऊन ऑनलाइन व्यावसायिक चहाविक्री कशी करायची?, चहा क्षेत्रात स्वतःचा ब्रँड कसा उभा करायचा?, चहाची विक्री कशी वाढवायची? याबाबत मार्गदर्शन होईल. या प्रशिक्षणानंतर थेट व्यवसाय उभे करण्याची व स्वतःच्या कॅफे, हॉटेल, रेस्टॉरंट इत्यादी आस्थापनांची चहाविक्री वाढवण्याची संधी उपलब्ध होईल.
(‘एसआयआयएलसी’च्या विविध प्रशिक्षण व कार्यशाळांची माहिती मिळवण्यासाठी व नावनोंदणीसाठी संपर्क : ८४८४८११५४४, ८९५६३४४४७२, ९३५६९७३४२७)
महारेरा सक्षमता प्रमाणपत्र प्रशिक्षण
प्रशिक्षण व प्रमाणपत्र नसणाऱ्या रिअल इस्टेट एजंटावर कारवाई करत त्यांची एजंट नोंदणी रद्द करण्याचा आदेश ‘महारेरा’ने दिला आहे. ‘महारेरा’ने आता नवीन एजंट नोंदणी व नोंदणीचे नूतनीकरण हे दोन्ही बंद केले आहे. यापुढे एजंटाकडे सक्षमता प्रमाणपत्र असेल तरच नवीन नोंदणी करता येईल अथवा मुदत संपलेल्या नोंदणीचे नूतनीकरण करता येईल. ज्या नोंदणीकृत एजंटाकडे सक्षमता प्रमाणपत्र नाही त्यांची रेरा नोंदणी ‘महारेरा’ने रद्द केलेली आहे. नोंदणीकृत रेरा एजंट होण्यासाठी आता २० तासांचे प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र मिळवणे अत्यावश्यक आहे. ‘एसआयआयएलसी’तर्फे होणाऱ्या प्रशिक्षणाची ऑनलाइन व ऑफलाइन बॅच १६ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे.
रिअल इस्टेट एजंटसाठी डिजिटल मार्केटिंग
खास रिअल इस्टेट एजंटसाठी केंद्रित २० तासांची डिजिटल मार्केटिंग कार्यशाळा १६ फेब्रुवारीपासून आयोजिली आहे. रिअल इस्टेट एजंटना स्वतःच्या अथवा ते ज्या बांधकाम व्यवसाय कंपनीसाठी काम करतात त्यांच्या व्यवसायाची मार्केटिंग करायची असेल, तर आजच्या काळात डिजिटल मार्केटिंग एवढे प्रभावी मार्केटिंग तंत्र उपलब्ध नाही. कोणत्याही कंपनीच्या किंवा संस्थेच्या प्रगतीत मार्केटिंग अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते. बांधकाम व्यवसाय क्षेत्रात कंपनीचे उत्पादन विकण्यासाठी हे डिजिटल मार्केटिंगचे तंत्र कसे वापरावे तसेच सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, सोशल मीडिया मार्केटिंग, मोबाईल मार्केटिंग, डिस्प्ले ॲडव्हर्टायझिंग अशा विविध तंत्रांचा उपयोग डिजिटल मार्केटिंग कसे करावे याचे प्रगत मार्गदर्शन प्रात्यक्षिकासहित कार्यशाळेत होणार आहे. प्रतिव्यक्ती शुल्क ४,९९९ अधिक जीएसटी.
(‘एसआयआयएलसी’च्या विविध प्रशिक्षण व कार्यशाळांची माहिती मिळवण्यासाठी व नावनोंदणीसाठी संपर्क : ८४८४८२२८५५, ८९५६३४४४७५, ७३५०००१६०२)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.