File Photo 
मुंबई

धारावीत शौचालयाच्या टाकीचा स्फोट

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : धारावी येथे शनिवारी (ता. 1) सकाळी शौचालयाच्या टाकीचा स्फोट होऊन पाच जण जखमी झाले. शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे धारावी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

शनिवारी सकाळी धारावीतील प्रेमनगर येथे शौचालयाच्या टाकीचा स्फोट होऊन शौचालयाचा काही भाग कोसळला. या घटनेत चंद्रशेखर जैस्वाल, चंद्रा शेखर, हमीद खान, कमलेश जैस्वाल व पलचंद्रा चौबे हे पाच जण जखमी झाले. त्यांना शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.

या घटनेमुळे मुंबईतील सार्वजनिक शौचालये असुरक्षित असल्याची चर्चा सुरू झाली आहे. काही महिन्यांपूर्वी भांडुप येथे शौचालयाचा भाग कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर आता पुन्हा अशा प्रकारची दुर्घटना घडली आहे. याकडे महापालिका प्रशासनाने लक्ष द्यावे आणि नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT