मुंबई : मुंबईत सोमवारी कोरोनाचे 510 नवे रुग्ण आढळले. सरकारने दारूविक्रीवरील निर्बंध उठवल्याने अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग कोलमडले. असे प्रकार रोखण्यासाठी बुधवारपासून ग्राहकांना टोकन देण्याची सूचना पोलिसांनी दुकानदारांना केली आहे. दुकानांसमोर ग्राहकांची गर्दी झाल्यास कडक कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
लॉकडाऊनच्या काळात विनाकारण घराबाहेर पडू नका, असे पोलिसांनी सतत सांगूनही नागरिक ऐकत नाहीत. म्हणून पोलिसांनी आता दुकानदारांना टोकन पद्धत सुरू करण्यास सांगितले आहे. ग्राहकाने सामानाची यादी दिल्यावर दुकानदार टोकन देईल. यादीनुसार सामान बांधून ठेवल्यावर दुकानदार ग्राहकाला दूरध्वनीवरून कळवेल, अशी संकल्पना असल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
मोठी बातमी : लवकरच येऊ शकते गोड बातमी ! १०० युनिटपर्यंत वीज मोफत? मंत्री नितीन राऊत यांचं मोठं वक्तव्य..
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रयत्न सुरू असूनही, बाधितांची संख्या 13 हजारांवर पोहोचली आहे; तसेच मुंबईत जवळपास 10 हजार रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबई पोलिसांनी नवी घोषणा केली आहे. त्यानुसार बुधवारपासून मुंबईतील दुकानदार ग्राहकांना टोकन देतील. दुकानांसमोरील गर्दी टाळण्यासाठी पोलिसांनी हा नवा नियम लागू केला आहे.
Tokens to customers in stores from today Police notice to avoid crowds
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.