kishori-pednekar.jpg 
मुंबई

मुंबईत चाळीपेक्षा टॉवरमध्ये कोरोनाचे रुग्ण जास्त - महापौर

दीनानाथ परब

"बऱ्याचवेळी दिल्या जाणाऱ्या सूचना महत्त्वाच्या असतात. पण आपण त्याकडे महत्त्वाच्या सूचना म्हणून बघतो का? हे महत्त्वाचे आहे. आताच्या घडीला रुग्ण संख्या वाढतेय. झोपडपट्टी, चाळीमध्ये रुग्णांचे प्रमाण कमी आहे. त्या तुलनेत टॉवरमध्ये रुग्ण संख्या जास्त आहे" असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. 

"टॉवरमध्ये जास्त रुग्णसंख्या असण्यामागे दोन ते तीन कारणे असू शकतात. टॉवरमध्ये सहजतेने कोणाला प्रवेश मिळत नाही. टॉवरमध्ये कोरोना चाचणीसाठी सहजतेने कोणी तयार होत नाही."

"हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारला, तरी काही जण दूध, भाजी आणायला बाहेर जात असतात. त्यामुळे आता पाच रुग्ण जरी आढळले, तरी आम्ही ती सोसायटी सील करत आहोत"असे मुंबईच्या महापौरांनी सांगितले. 

"आता रुग्णालय प्रवेशासाठी दिवसाला शंभर-दीडशे फोन येत आहेत. ही रुग्ण संख्या आणि धोका वाढत असल्याचे लक्षण आहे. कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी लोकांनी स्वत:ची आवश्यक काळजी घ्यावी. आम्ही सगळी यंत्रणा तयार ठेवली आहे. सध्या १५ हजार बेडस उपलब्ध आहेत. आम्ही २५ हजार बेडसची तयारी ठेवली आहे. लोक स्वत:च खासगी रुग्णालयांची निवड करतायत" असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT