मुंबई-पुणे प्रवास होणार वेगवान! मिळाली ही परवानगी... 
मुंबई

मुंबई-पुणे प्रवास होणार वेगवान! मिळाली ‘ही’ परवानगी...

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : शीव-पनवेल महामार्गावर वाशी टोलनाक्‍यावर तयार करण्यात येत असलेला तिसऱ्या पुलाचा मार्ग मोकळा झाला आहे. नवी मुंबई महापालिकेने खाडीपूल उभारण्याच्या कामात अडथळा ठरणारी 281 झाडे काढण्याची परवानगी रस्तेविकास महामंडळला दिली आहेत. त्यामुळे मुंबई-पुण्याला ये-जा करताना नेहमी होणारी वाहतूक कोंडी फुटणार आहे. 

शीव-पनवेल महामार्गाला जोडणारा वाशी खाडीपूल नियमित होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नकोसा झाला आहे. मुंबईहून पुण्याला जाताना अथवा पुण्याहून मुंबईला येताना वेगवान प्रवासात या पुलावर नेहमी होणारी वाहतूक कोंडी अडथळा ठरत होती. रस्त्यावर दिवसेंदिवस वाहनांची वाढलेली संख्या आणि त्या तुलनेत कमी रुंदीचे रस्ते वाहतूक कोंडीला आमंत्रण देतात. त्याकरिता वाशी खाडीपुलावर रस्ते विकास महामंडळाकडून दोन नवीन उड्डाणपूल तयार केले जात आहेत. खाडीपुलाच्या शेजारी मुंबईच्या दिशेने व पुण्याच्या दिशेने आशा दोन्ही बाजूला उड्डाणपूल तयार केले जाणार आहेत. या प्रकल्पात मुंबईकडील आणि पुण्याकडील दोन्ही बाजूला कांदळवनांचा अडथळा आहे. सुमारे दीड हेक्‍टरवरील कांदळवने काढून दुसऱ्या ठिकाणी लावण्याच्या अटीवर वनखात्याने याआधीच रस्ते विकास महामंडळाला परवानगी दिली आहे. परंतु मार्गदर्शक सूचनांसाठी उच्च न्यायालयात कांदळवने लागवड आणि कापण्याबाबत परवानगी मिळवण्यासाठी रस्ते विकास महामंडळाची याचिका दाखल केली. या याचिकेवर सुनावणी झाली असून, लवकरच निर्णय दिला जाणार आहे. याच निर्णयाच्या अधीन राहून, नवी मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने 305 झाडांपैकी 281 झाडे काढण्याची परवानगी रस्ते विकास महामंडळाला दिली आहे. गुरुवारी पार पडलेल्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत, ही झाडे काढण्यास पालिकेने हिरवा कंदील दर्शवला. या परवानगीमुळे वाशी खाडीवर आणखीन दोन नवे उड्डाणपूल उभारण्याचा मार्ग सुकर झाला आहे. 

दरम्यान, वाशी खाडीपुलावर दोन उड्डाणपूल उभारण्याकरिता आवश्‍यक असणाऱ्या परवानग्या अखेरच्या टप्प्यात आहेत. कांदळवनांबाबत उच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. अशी माहिती रस्ते विकास महामंडळाच्या एका अधिकाऱ्याने दिली. 

मुंबई महापालिकेची परवानगी आवश्‍यक 
वाशी खाडीच्या दोन्ही बाजूला असलेल्या 442 झाडांपैकी नवी मुंबई महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या 305 झाडांपैकी 281 झाडे काढण्यात रस्ते विकास महामंडळाला परवानगी मिळाली आहे. मात्र, मानखुर्दजवळची सुमारे 137 झाडे काढण्यासाठी मुंबई महापालिकेच्या परवानगीची आवश्‍यकता आहे; परंतु नवी मुंबई महापालिकेची परवानगी मिळाल्यामुळे रस्ते विकास महामंडळाला कामाला सुरुवात करता येणार आहे. 

कांदळवन व वृक्षारोपण करणार 
305 झाडांपैकी नवी मुंबई महापालिकेला 24 झाडांना वाचवण्यात यश आले आहे; परंतु उर्वरित 281 झाडांच्या बदल्यात दोन ते तीनपट नवीन झाडे रस्ते विकास महामंडळाला लावावी लागणार आहेत. बोरिवलीतील एरंगल या परिसरात ही झाडे लावण्यात येणार आहेत; तर वाशीतील झाडांच्या बदल्यात टीटीसी औद्योगिक पट्ट्यातील सुमारे 1.2 हेक्‍टर परिसरात 1189 झाडे लावण्यात येणार आहेत. कांदळवन रोपण करण्यासाठी रस्ते विकास महामंडळाने वन विभागाला 15 लाख 20 हजार दिले आहेत; तर 1.4074 हेक्‍टर जागेच्या बदल्यात 14 लाख 67 हजार रुपये दिले आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

G Ram Ji Bill: विरोधकांचा गोंधळ, घोषणाबाजी आणि कागदफाड... तरीही जी रामजी विधेयक लोकसभेत मंजूर; यात काय विशेष आहे?

Cameron Green: कॅमेरून ग्रीनच्या हाती TAX कापून किती रक्कम येणार? आधीच Welfare Fund मुळे ७.२० कोटी कापले जाणार...

Liam Livingstone ला १३ कोटी देण्याची खरच गरज होती का? काव्या मारनच्या निर्णयावर होतेय टीका, मोहम्मद शमीचं नाव ओढलं जातंय... कारण

Sangli Shaktipith : आधी इलेक्शन, मग नवे रेखांकन; शक्तिपीठ महामार्गावर सरकारची सावध पावले

Career Growth Astrology: मिथुन राशीसाठी 2026 ठरणार सुवर्णकाळ! गुरुच्या भ्रमणामुळे आयुष्यात लाभ अन् मोठी संधी

SCROLL FOR NEXT