उल्हासनगर : गेल्या तीन वर्षांपासून उल्हासनगर महानगरपालिकेत उपआयुक्त आणि मुख्य लेखापरीक्षक असणाऱ्या दोन अधिकाऱ्यांची बदली झाली असून तर दोघांची अंतर्गत अदलाबदली करण्यात आली आहे.
बदली झालेल्यात उपआयुक्त आरोग्य मदन सोंडे आणि मुख्य लेखापरीक्षक मंगेश गावडे यांचा समावेश आहे.सोंडे यांच्या जागी पाणी पुरवठा,वैद्यकीय आरोग्य विभागाचे उपआयुक्त डॉ.सुभाष जाधव आणि गावडे यांच्या जागी उप लेखापरीक्षक विजय खेडेकर यांच्याकडे प्रभारी पदभार सोपवण्यात आला आहे.
तसेच प्रभाग समिती ४ चे सहायक आयुक्त अजय एडके यांची पर्यावरण व वाहन विभागाच्या सहायक आयुक्त पदावर बदली करण्यात आली आहे.एडके यांच्या जागी वैद्यकीय आरोग्य विभागातील वरिष्ठ लिपिक महेंद्र पंजाबी यांच्याकडे सहायक आयुक्त पदाचा प्रभारी कार्यभार सोपवून दोघांचीही अंतर्गत अदलाबदली करण्यात आली आहे.काही महिन्यांपूर्वी देखील महेंद्र पंजाबी हे प्रभाग समिती ४ च्या सहायक आयुक्त पदावर होते.पुढे त्यांची वैद्यकीय आरोग्य विभागात बदली करण्यात आली होती.आता महेंद्र पंजाबी यांचे सहायक आयुक्त पदावर पुन्हा कमबॅक झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.