local train sakal
मुंबई

लोकलसाठी लससक्ती मागे घेण्यास सरकार तयार; २८ फेब्रुवारीला सुनावणी

लोकल प्रवासासाठी प्रवाश्यांना कोरोना लशींचे दोन्ही डोस घेणं बंधनकारक असणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता शासनाने कडक नियमांचे आदेश दिले होते. दरम्यान, कोरोनामुळे लोकलमधून प्रवास करण्यासाठी करण्यात आलेली लससक्ती मागे घेतली जाऊ शकते अशी माहिती मिळाली होती. दरम्यान, आता लोकलसाठी लससक्ती मागे घेण्यास राज्य सरकार तयार असून २८ फेब्रुवारीला याबाबतची पुढील सुनावणी उच्च न्यायालयात होणार आहे.

याबाबत महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात सांगितले की, गेल्या वर्षी 15 जुलैसह 10 आणि 11 ऑगस्टची परिपत्रके आणि एसओपी मागे घेण्यास तयार आहे. तरीही केवळ पूर्ण लसीकरण झालेल्या लोकांनाच लोकल ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी दिली जाणार आहे. त्यामुळे प्रवास करत असताना परिपत्रके किंवा एसओपीचे पुनरावलोकन केले जाणार आहे. लोकल प्रवासासाठी प्रवाश्यांना कोरोना लशींचे दोन्ही डोस घेणं बंधनकारक असणार आहे. राज्यसरकार या निर्णयावर ठाम असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, राज्य सरकार रेल्वे प्रवासासंबंधित असलेल्या सक्ती मागे घेण्यासाठी तयार आहे. याबाबत संबंधित मार्गदर्शक तत्वे निश्चित करणाऱ्या समितीची दोन-तीन दिवसांत बैठक होणार आहे. त्यामध्ये अंतिम निर्णय घेण्यात येईल असे राज्य सरकारने उच्च न्यायालयाला सांगितले आहे. याप्रकरणी सोमवारी पुढील सुनावणी होणार आहे. राज्य सरकारने यापूर्वी लस न घेतलेल्या नागरिकांना प्रवासाला मनाई करून त्यांच्या मूलभूत अधिकारांवर आक्रमण केले आहे. तत्कालीन मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी घेतलेला निर्णय बेकायदेशीर आहे, असे हायकोर्टाने म्हटले आहे.

दरम्यान हायकोर्टाने लससक्ती मागे घ्यायची की नाही यासंबंधी निर्णय घेण्यास सरकारला वेळ दिली आहे. पुढील सुनावणी २८ फेब्रुवारीला होणार आहे. २५ फेब्रुवारीला कार्यकारिणीची बैठक होणार आहे. त्यात उच्च न्यायालयात झालेली चर्चा, सध्याच्या परिस्थितीचा आढावा, कृती दलाचे म्हणणे या सगळ्याचा विचार करून नवा निर्णय घेतला जाईल असं सरकारने स्पष्ट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT