मुंबई

या शहरात शुद्ध शाकाहारी हॉटेलची चलती 

प्रमाेद जाधव

अलिबाग : पापलेट, हलवा, सुरमई अशा एकापेक्षा एक सरस माशांचा आस्वाद घेण्यासाठी अनेक पर्यटक अलिबागला आवर्जून भेट देतात; पण आता या ठिकाणी "शुद्ध शाकाहारी' हॉटेलची चलती आहे. शाकाहारी पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन व्यवसायवृद्धीसाठी चार वर्षांत हा ट्रेंड लोकप्रिय झाला आहे. 

विस्तीर्ण समुद्रकिनारे हे अलिबाग तालुक्‍याचे खास वैशिष्ट्य. ताज्या माशांपासून तयार केलेले स्वादिष्ट भोजन मिळत असल्याने मुंबई आणि राज्यातील अनेक लहान-मोठ्या शहरातील पर्यटक एक-दोन दिवसांसाठी अलिबागला भेट देतात; पण आता मांसाहारी हॉटेल व्यवसायाला शाकाहारी हॉटेल मागे टाकत आहेत. 

हे वाचा : गणेश नाईकांना धक्का  

जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार 1985 च्या दरम्यान शहरात दोनच शुद्ध शाकाहारीचे हॉटेल होते. मुंबई, पुणे, गुजरात, राजस्थान येथून येणाऱ्या पर्यटकांसाठी ती सोय होती. परंतु या ठिकाणी गर्दी वाढत असल्याने अनेकांना शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ देणाऱ्या हॉटेलमध्ये जाण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे शुद्ध शाकाहारी पर्यटक नाराजीही व्यक्त करत होते. त्यामुळे शाकाहारी हॉटेलची संख्या वाढू लागली आहे. 
शहरातील हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले की, 40 टक्के पर्यटक शुद्ध शाकाहारी भोजनाचा आस्वाद घेतात. त्यामुळे "शुद्ध शाकाहार' पाट्या मिरवणारी 15 पेक्षा अधिक हॉटेल आहेत. 

मुंबई, पुणे येथे गुजराती, मारवाडी व ब्राह्मण समाजासह अन्य काही समाजातील पर्यटक शुद्ध शाकाहारी भोजनाचा आनंद घेतात. शाकाहारीकडे ग्राहक वळू लागले आहे. त्यामुळे शुद्ध शाकाहारी हॉटेलची संख्या वाढत आहे. 
- रोहन चिमणे, मालक, सुरुची हॉटेल 

अलिबागमध्ये पर्यटनासाठी आल्यानंतर एकेकाळी शाकाहारी हॉटेल शोधावे लागत होते. परंतु काही वर्षांपासून त्यात बदल झाला आहे. या शहरात शुद्ध शाकाहारी हॉटेलची संख्या वाढली आहे. त्यामुळे गैरसोय टळली आहे. 
- सतीश देशमुख, पर्यटक  

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs CSK: वैभव सूर्यवंशीचा चेन्नईविरुद्ध झंझावात! विक्रमी अर्धशतक करत राजस्थानला मिळवून दिला 'रॉयल' विजय

लाडकी बहीण योजनेतून ७१ लाख महिला बाहेर, Ekyc साठी उरले फक्त २४ तास

IPL 2026: ७ वर्षे अन् २७७ सामने... CSK च्या बाबतीत पहिल्यांदाच घडली अशी घटना

खरात बोलतात तसं घडतं! माणिकराव कोकाटेंबद्दल तंतोतंत भविष्यवाणी केलेली; नामकर्ण आवारेंच्या पुस्तकात १३ पानं खरातवर

Akola Rain : अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा; वीज पडून झाडाला लागली आग

SCROLL FOR NEXT