ketaki chitale
ketaki chitale 
मुंबई

व्यंग असल्यानेच मला मालिकेतून वगळले - केतकी चितळे (व्हिडिओ) 

वृत्तसंस्था

मुंबई - ‘लक्ष्मी सदैव मंगलम्’ या मालिकेत केतकी चितळे काम करत होती. परंतु, अचानक आपली मालिकेतून हकालपट्टी केल्याचे तिने म्हटले आहे. फेसबुकवर व्हिडिओ पोस्ट करत तिने निर्मात्यांवर हे आरोप केले आहेत. तर दुसरीकडे केतकीच्या भूमिकेमुळे मालिकेच्या टीआरपीमध्ये फारसा फरक पडत नसल्यामुळे तिला काढून टाकल्याचे दिग्दर्शक राकेश सारंग यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, केतकीला एपिलेप्सि (epilepsy) चा त्रास आहे. त्यामुळे मला मालिकेतून काढल्याचे कोतकीने म्हटले आहे.

तिने आपल्या फोसबुक पोस्टमध्ये, हा आजार नसून ते एक मेंदूशी निगडीत व्यंग आहे. या व्यंगात रुग्णाला कधीकधी अचानक झटके येतात. माझ्या भूमिकेला टीआरपी मिळत नसल्याचे कारण देत अचानक दुसऱ्या अभिनेत्रीला मालिकेत आणण्यात आले आहे. माझ्या व्यंगामुळे मला या मालिकेतून बाहेर काढले असल्याचे म्हटले आहे. तसेच मी याविरोधात आवाज उठवला कारण, हा माझ्या एकटीवरचा अन्याय नाही तर माझ्यासारख्या या व्यंगामुळे ग्रस्त असलेल्यांवरचा अन्याय आहे,’ असे केतकीने तिच्या फेसबुक व्हिडिओत म्हटले आहे. सेटवर वातावरणाबद्दलही तिने या व्हिडिओत तक्रारी केल्या आहेत. ‘मालिकेच्या नुकत्याच शूट झालेल्या रंगपंचमीच्या सिक्वेन्समध्ये आम्हाला ‘परफ्युम्ड सेन्टेड कलर्स’ वापरायला दिले. यामुळे माझ्या अंगाला खाज सुटली,’ असेही तिने सांगितले.

दुसरीकडे केतकीने केलेले सर्व आरोप दिग्दर्शक राकेश सारंग यांनी फेटाळले आहेत. केतकी सोशल मिडियाचा गैरवापर करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. केतकीच्या व्यंगाविषयी आम्हाला कल्पना होती. म्हणून तिची तब्येत बरी नसायची तेव्हा सेटवर आम्ही तिला आराम करायला वेळ देत असल्याचे सारंग यांनी म्हटले आहे. तिच्या भूमिकेमुळे मालिकेला विशेष टीआरपी मिळत नव्हता. तिच्या भूमिकेबाबत आणि सर्व्हे करून लोकांचे मतसुद्धा घेतले. त्यानंतरच आम्ही अभिनेत्री बदलण्याचा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT