मुंबई

टीव्ही अभिनेत्री मालवी मल्होत्रावर मुंबईत जीवघेणा हल्ला; कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरु

सुमित बागुल

मुंबई : विविध हिंदी सिनेमा आणि टीव्ही सिरियल्समध्ये काम करणारी अभिनेत्री मालवी मल्होत्रावर मुंबईत जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. हल्ल्यानंतर आता मालवी मल्होत्राला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. काल रात्री तिच्याच एका मित्राने तिच्या शरीरावर तीन वेळा चाकूने वार केले आहेत. स्वतःला प्रोड्युसर म्हणवणाऱ्या योगेश कुमार नामक इसमाने मालवीवर हल्ला केलाय. 

समोर येणाऱ्या माहितीनुसार मालवीची योगेशसोबत फेसबुकवरून मैत्री झालेली. एकतर्फी प्रेमातून या इसमाने मालवी मल्होत्रावर हल्ला केल्याचं बोललं जातंय. या घटनेनंतर मुंबईतील वर्सोवा पोलिसस्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार योगेशने मालवीवर चाकूने सपासप तीन वार केलेत.  

मालवीच्या माहितीनुसार तिची आणि योगेश महिपाल सिंह याची फेसबुकवरून ओळख झाली होती. ती कामानिमित्त योगेशला कॉफी कॅफे डे मध्ये एकदा भेटली होती. सोमवारी रात्री मालवी कामानिमित्त बाहेर निघाली तेंव्हा योगेश त्याच्या ऑडी कारबाहेर उभा होता. भर रस्त्यात त्याने मालवीला थांबवण्याचा प्रयत्न केला. मालवीने त्याचा विरोध केल्यानंतर त्याने तिच्यावर चाकूने सपासप वार केलेत. मालवीवर हल्ला करून हल्लेखोर योगेश तिथून फरार झाला. 

'अटेंम्ट ऑफ मर्डर' चा गुन्हा दाखल  

मालवीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न करण्याची तक्रार दाखल करून घेतली आहे. मुंबई पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांना घटनास्थळी असलेल्या CCTV मधून महत्त्वाची माहिती मिळाली आहे.   

दरम्यान सध्या उपचारानंतर मालवी मल्होत्रांची तब्येत आता सुधारत असून तीची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याचं रुग्णालयातून समजतंय. 

मालवी मल्होत्राबद्दल थोडक्यात  

मालवी मल्होत्राने विविध तेलगू आणि मल्याळम सिनेमांमध्ये काम केलंय. सोबतच तिने हिंदी सिनेमांमध्ये देखील विविध भूमिका साकारल्या आहेत. मालवी हिने टीव्हीवर येणाऱ्या उडान कार्यक्रमात देखील काम केलंय. मंडी मधील डीएवी सीपीएस शाळेत तिचं शिक्षण झालंय. मालवीने मुंबईतूनच सहा महिन्यांचा अभिनयाचा एक कोर्स देखील केलाय. तिला कविता लिहिण्याची आवड आहे. 

TV actress malavi malhotra attacked by facebook friend taking treatment in kokilaben hospital

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT