मुंबई

बारावी फेरपरीक्षेचा निकाल जाहीर; मुंबई विभागातून सर्वाधिक 3 हजार 728 विद्यार्थी उत्तीर्ण

तेजस वाघमारे


मुंबई  : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी फेरपरीक्षेचा निकाल बुधवारी (ता.23) जाहीर करण्यात आला. या परीक्षेचा निकाल 18.41 टक्के लागला असून राज्यभरातून 12 हजार 751 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गत वर्षीच्या तुलनेत यंदा निकाल सुमारे पाच टक्‍क्‍यांनी घसरला आहे. मुंबई विभागातून सर्वाधिक 3 हजार 728 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे फेब्रुवारी मार्च 2020 बारावी परीक्षेचा निकाल जुलैमध्ये जाहीर झाला. यामुळे जुलै ऑगस्ट महिन्यात फेरपरीक्षा घेणे शक्‍य झाले नाही. त्यामुळे 20 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेसाठी राज्यभरातून 69 हजार 542 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर 69 हजार 274 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. या परीक्षेत 12 हजार 751 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्वाधिक 27.63 टक्के निकाल औरंगाबाद मंडळाला लागला आहे. या मंडळातून 6 हजार 927 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 1 हजार 914 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्याखालोखाल नाशिक विभागाचा निकाल 23.63 टक्के लागला आहे. या मंडळातून 7 हजार 492 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 1 हजार 770 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नागपूर मंडळातून 5 हजार 716 विद्यार्थ्यांपैकी 1 हजार 65 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विभागाचा निकाल 18.63 टक्के लागला आहे. मुंबई विभागीय मंडळातून 22 हजार 700 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 3 हजार 728 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून मंडळाचा निकाल 16.42 टक्के लागला आहे. 

कोल्हापूर विभागातून 5 हजार 359 विद्यार्थ्यांपैकी 793 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून मंडळाचा निकाल 14.80 टक्के लागला आहे. अमरावती विभागातून 3 हजार 677 विद्यार्थ्यानी परीक्षा दिली होती. त्यापैकी 598 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून मंडळाचा निकाल 16.26 टक्के लागला आहे. लातूर विभागातून 4 हजार 27 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 888 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून मंडळाचा निकाल 22.5 टक्के लागला आहे. तसेच कोकण मंडळातून 541 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 78 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 2018 मध्ये फेरपरीक्षेचा राज्याचा एकूण निकाल 22.65 टक्के लागला होता. तर 2019 मध्ये 23.17 टक्के आणि 2020 मध्ये राज्याचा निकाल 18.41 टक्के लागला आहे. गत वर्षीच्या तुलनेत यंदा निकालामध्ये 4.76 टक्के घट झाली आहे. 

गुण पडताळणीसाठी 24 डिसेंबर ते 2 जानेवारी 2021 पर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल. यासाठी प्रति विषय 50 रूपये शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करावे लागेल. तसेच उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीच्या मागणीसाठी ईमेल, हस्तपोहोच किंवा रजिस्टर पोस्ट यापैकी एका पर्यायाची निवड विद्यार्थ्यांना करता येईल. यासाठी 24 डिसेंबर ते 12 जानेवारी या कालावधीत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येईल. उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी प्रति विषय 400 रूपये इतके शुल्क मंडळाकडे जमा करावे लागणार आहे

Twelfth re-examination results announced The highest number of 3 thousand 728 students passed from Mumbai division

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahapalika Election: सर्वात मोठी बातमी! 'या' प्रभागातील निवडणूकीला न्यायालयाची अंतरिम स्थगिती, मतदान कधी होणार?

Latest Marathi News Live Update : पुण्यातील प्रभाग ९ चे राजकारण तापणार

Madhav Gadgil: ‘नीरी’ला कटू सत्याची करून दिली आठवण; पद्मभूषण डॉ. माधव गाडगीळ यांनी पर्यावरण अहवालातील त्रुटी केल्या होत्या उघड!

Lonar Lake Level: कमळजा मातेच्या मुखवट्याला पाण्याचा स्पर्श; लोणार सरोवरातील जलपातळी आणखी धोक्याच्या टप्प्यावर!

IPO Market : सरकारी मिनीरत्न कंपनीत गुंतवणुकीची संधी! आजपासून IPO खुला; आधी जाणून घ्या ही महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT