Mumbai Sakal
मुंबई

उच्चभू वसाहतीत कोकेनची विक्री दोघांना अटक; एक विदेशी नागरिक

त्याच्याकडून ३६ लाख रुपयांचे १२० ग्रॅम वजनाचे कोकेन जप्त केले.

सकाळ वृत्तसेवा

अंधेरी : शहरातील उच्चभू वसाहतीत कोकेनची विक्री करणाऱ्‍या दोघांना वांद्रे युनिटच्या अमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकाऱ्‍यांनी अटक केली. त्यात एका विदेशी नागरिकाचा समावेश असून अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने पोलिस (Police) कोठडी सुनावली आहे. मोहम्मद नौमान शाहिद कुरेशी आणि याकूब माचो नागानिला ऊर्फ मशाका अशी या दोघांची नावे आहेत.

यातील मोहम्मद नौमान हा पत्रकार असून मशाका हा टांझानियाचा नागरिक असल्याचे पोलिसांनी सांगितले. सोमवारी २७ सप्टेंबरला वांद्रे युनिटचे प्रभारी पोलिस निरीक्षक संजय चव्हाण हे त्यांच्या पथकासह वांद्रे येथील बीकेसी, टाटा वसाहत रोडवरील वाधवान कंस्ट्रक्शन गेटसमोर गस्त घालत होते. यावेळी पोलिसांना पाहताच एक तरुण पळू लागला होता. त्याची हालचाल संशयास्पद वाटताच त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना १०५ ग्रॅम वजनाचे कोकेन आणि दोन लाख दहा हजार रुपयांची कॅश सापडली. चौकशीत त्याला ते कोकेन टांझानिया नागरिक असलेला मशाका याने दिल्याचे उघडकीस आले. मग त्यालाही अटक केली. त्याच्याकडून ३६ लाख रुपयांचे १२० ग्रॅम वजनाचे कोकेन जप्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! नवीन कर्जासाठी CIBIL ची अट नाही... RBI देणार सर्व बँकांना पत्र, शेतकऱ्यांना ५० हजार अनुदान देण्याचेही संकेत

Amravati MLC Result : 'महायुती'चे किरण सरनाईक 3,650 मतांनी आघाडीवर; अदिती पोहरेंचीही जोरदार मुसंडी, देशपांडेंना पछाडत पोहोचल्या दुसऱ्या क्रमांकावर, काय आहे मतदारसंघाचे चित्र?

Farmer Relief: दिवाळीपूर्वी दीड कोटी शेतकऱ्यांना ५ हजार रुपये, अटी शर्तींसह मदत; कोण पात्र आणि अपात्र?

Marathi News Live Updates : चक्रीवादळ अर्नबचा आंध्र प्रदेशाला मोठा तडाखा, कोनसीमा जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस

Chandgad Pumped Storage Project : चंदगडच्या धामापूर-कानूर भागात 7,519 कोटींचा जलविद्युत प्रकल्प; 390 हेक्टर जमीन अधिग्रहित होणार? 'असा' आहे मास्टर प्लॅन

SCROLL FOR NEXT