water drown Sakal media
मुंबई

भिवंडीत वऱ्हाळ तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

भिवंडी : शहरातील वऱ्हाळ तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा (water drowning) पाण्यात बुडून मृत्यू (two children death) झाला. याप्रकरणी भिवंडी शहर पोलिसांनी (Bhiwandi police) नोंद घेऊन चौकशी सुरू केली आहे. अमन आरिफ चौऊस (वय १३) आणि अमान सरफराज अन्सारी (वय १५, दोघेही रा. पटेल कंपाऊंड, भिवंडी) अशी त्यांची नावे आहेत. भिवंडी शहरातील ठाणे रोडवरील पटेल कंपाऊंड येथील अमन व अमान हे चार मित्रांसह कामतघर परिसरातील वऱ्हाळ तलाव (varhal lake) येथे शुक्रवारी (ता. ८) दुपारी फिरत आले होते.

त्यानंतर दोघे पाण्यात पोहण्यासाठी उतरले होते. पाण्यात बुडू लागताच त्यांनी आरडाओरड सुरू केली; मात्र त्यांच्या चार मित्रांनी पळ काढला. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांसह अग्निशमन दलास दिली. अग्निशमनचे जवान घटनास्थळी दाखल होत शोधमोहीम सुरू केली. तीन तासांच्या शोधमोहिमेनंतर अमन याचा मृतदेह हाती लागला. त्यानंतर रात्री ९ वाजता अमान याचाही मृतदेह हाती लागला. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करीत दोन्ही मृतदेह शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवले आहेत.

सुरक्षा रक्षकाची गरज

तलावाच्या सुरक्षिततेसाठी भिवंडी पालिका प्रशासनाने सुरक्षा रक्षक तैनात करणे आवश्यक आहे; मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे. या तलावातून जुन्या भिवंडीतील दीड लाख नागरिकांना दोन एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे पालिका प्रशासनाने तातडीने सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी, अशी मागणी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी नगरसेवक साईनाथ पवार यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नोरासारखी दिसायला पाहिजे, पत्नीला दररोज ३ तास...; पतीकडून छळ, महिलेची पोलिसात तक्रार

Maharashtra Latest News Update: महत्वाच्या विषयांवर फडणवीसांची भेट घेतली- राज ठाकरे

Reels addiction Impact on Brain Like Alcohol: रील्सचा मोह करतोय मेंदूवर दारूसारखा परिणाम? जाणून घ्या धोके आणि तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय

माेठी बातमी! 'इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक; दूध दर वाढीसाठी संसद भवनासमोर आंदोलन', भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करा

Pune Rain Update : ताम्हिणी घाटात ५७५ मिमी पावसाची नोंद; पुण्यात रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT