५०० रुपये शोधूनही सापडले नाही! वडिलांच्या भीतीपोटी मुलींनी सोडलं घर! 
मुंबई

५०० रुपये शोधूनही सापडले नाही! वडिलांच्या भीतीपोटी मुलींनी सोडलं घर!

सकाळ वृत्तसेवा

उल्हासनगर : वडिलांनी मुलींकडे दळण आणण्यासाठी 500 रुपये दिले. ते पडल्याने आणि शोधूनही सापडत नसल्याने वडील रागावतील या भीतीने निर्जनस्थळी 24 तास लपून बसलेल्या दोन अल्पवयीन बहिणींना उल्हासनगर गुन्हे अन्वेषणने शोधून काढले. त्यांना त्यांच्या पालकांच्या सुपूर्द करून वडिलांना फादर-डेची अनोखी गिफ्ट दिली आहे.

अंबरनाथ पूर्वेला शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका व्यक्तीने 20 तारखेला त्यांच्या दोन अल्पवयीन मुलींकडे पिठाच्या चक्कीमधून दळण आणण्यासाठी 500 रुपये दिले होते; पण हातातील पैसे पडल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी शोध घेतला; पण पैसे सापडत नसल्याने आता वडील मारतील या भीतीने त्या घाबरल्या. भीतीपोटी दोन्ही बहिणींनी लपण्यासाठी काही अंतरावर असलेले निर्जन स्थळ गाठले. बराच वेळ झाला तरी मुली घरी आल्या नाहीत म्हणून वडिलांनी चक्की गाठली; पण त्या आल्याच नाही, असे सांगण्यात आल्यावर ते अस्वस्थ झाले. त्यांनी सर्वत्र विचारपूस चौकशी केली. शेवटी त्यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

मुलींचा शोध घेण्यासाठी शिवाजीनगर पोलिस ठाण्यासोबत उल्हासनगर गुन्हे अन्वेषणचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश तरडे, सहायक पोलिस निरीक्षक एस. ए. फडोळ, हवालदार जाधव, पोलिस नाईक वाघमारे, नवनाथ कोरडे, दादा भोसले आदी टीमने कंबर कसली. एखाद-दोन किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या जंगल व निर्जन स्थळावर शोधाशोध केल्यावर एका मोठ्या खड्ड्यामध्ये दोन्ही बहिणी लपून बसल्या होत्या. पोलिसांना बघून त्या घाबरल्या. पोलिसांनी त्यांना आपुलकीने जवळ घेऊन पाणी पाजले. शिवाजीनगर पोलिस ठाण्याकरवी त्यांना त्यांच्या पालकांच्या सुपूर्द केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather: पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! उकाड्यानंतर पुन्हा पावसाची शक्यता; पुढील दोन ते तीन दिवसांचा अंदाज

Mumbai: 'लालबागचा राजा'च्या दर्शनाच्या नावाखाली ४ भाविकांना गंडा, बारावीतील विद्यार्थ्याला अटक

Patna Mother Murder : मुलानेच आईला जिवंत जाळलं; पोलिसांना म्हणाला- ‘मी देवाचा अवतार, कलियुग सुरूय, मीच तिला संपवलं'

Marathi News Live Updates : ममता बॅनर्जींची सर्वोच्च न्यायालयात धाव; TMC नाव आणि पारंपरिक चिन्हाबाबत निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान

Badrinath Military Exhibition : बदरीनाथमध्ये मुख्यमंत्र्यांचा रायफल हातात घेत नेमबाजीचा सराव; लष्करी प्रदर्शनाची घेतली पाहणी

SCROLL FOR NEXT