two died in Bus Accident on Manor- Vikramgad road Palghar15 to 20 people seriously injured
two died in Bus Accident on Manor- Vikramgad road Palghar15 to 20 people seriously injured  
मुंबई

Palghar Bus Accident : बस- डंपरमध्ये भीषण अपघात; दोन जण ठार, १५ प्रवासी जखमी

अमोल सांबरे

विक्रमगड : विक्रमगड-मनोर मार्गावरील केव फाटा जवळ हायवा(ट्रक)-बस एकमेकांना धडकून भिषण अपघात झाला. या अपघातात पंधरा प्रवासी गंभीर जखमी झाले. तर दोन मुलांचा मृत्यू झाला. मनोर कडून विक्रमगड कडे जाणारी हायवा तर विक्रमगड कडून मनोर कडे जाणारी पालघर-शिर्डी बस केव फाटा येथे समोरासमोर धडक बसल्याने हा अपघात झाला.

पालघर-शिर्डी बस व हायवा(ट्रक) दुपारी 1.30 च्या सुमारास मनोर-विक्रमगड मार्गावरील केव फाटा जवळ वळणावर एकमेकांना धडकल्या. यात 15 प्रवासी गंभीर जख्मी झाले असुन. जखमींना स्थानिकांनी बसमधून बाहेर काढून मनोर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.

जखमींवर मनोर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून, अनेक प्रवासी गंभीर जख्मी आहेत. तर हा अपघात इतका गंभीर होता की या अपघातात बसची केबीन व एक बाजू चक्का-चूर झाली आहे.

केव फाटा व आसपासच्या वाकणात अनेक अपघात झाले आहेत. या मार्गांवर मोठ्या प्रमाणात दगडी खदाणी व क्रेशर असल्याने या मार्गावर रात्र न दिवस निष्काळजी पणे लोंडिंगच्या हायवा चालवल्या जातात.. त्यामुळे या मार्गांवर अनेक अपघात झाले आहेत. या बाबत अनेक वेळा पोलीसाना निवेदन देऊन ही पोलीस कुठलीही दखल घेत नाहीत.

- ज्ञानेश्वर पाटील (जिल्हा अध्यक्ष रस्ते आस्थापना, मनसे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

Nashik Lok Sabha Election 2024: ना पाण्याची सोय, ना उन्हापासून संरक्षण! मतदारांमध्ये तीव्र नाराजी; व्हिलचेअरमुळे दिलासा

SCROLL FOR NEXT