मुंबई

ब्रेकिंग - विकास दुबे प्रकरणात ठाण्यात मोठी कारवाई, दुबेच्या दोन साथीदारांच्या ATS ने आवळल्या मुसक्या 

अनिश पाटील

मुंबई : विकास दुबे प्रकरणात मुंबई नजीकच्या ठाणे शहरातून मोठी कारवाई करण्यात आलीये. महाराष्ट्र कानपूर येथील आठ पोलिसांच्या हत्येतील दोन संशयीतांना ठाणे येथून पकडण्यात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाला म्हणजेच महाराष्ट्र ATS ला यश आलंय. कानपूरमधील आठ पोलिसांच्या हत्येतील मुख्य सूत्रधार विकास दुबे शुक्रवारी सकाळी झालेल्या एन्काउंटरमध्ये मारला गेला. 

विकास दुबेचा साथिदार ४६ वर्षीय अरविंद ऊर्फ गुड्डन रामविलास त्रिवेदी आणि ३० वर्षीय सुशीलकुमार ऊर्फ सोनू सुरेश तिवारी अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. त्यांना लवकरच उत्तर प्रदेश ATS च्या स्वाधीन करण्यात येणार आहे. 

कानपूर हत्याकांड प्रकरणातील संशयीत गुड्डन ठाणे परिसरात असल्यााची माहिती एटीएसला मिळाली होती. त्यानुसार जुहू युनीटचे प्रभारी पोलिस निरीक्षक दया नायक यांनी ठाण्यातील कोलशेत रोड येथे सापळा रचन गुड्डन त्रिवेदीला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याचा चालक सोनू तिवारीही उपस्थित होता. याप्रकरणी सरकारने रोख रकमेचे बक्षीस जारी केले आहे. आ

रोपी गुड्डनविरोधात 2001 मध्ये हत्येचा गुन्हा दाखल आहे. त्यात विकास दुबेसह आरोपींनी चौबेपूर ठाण्यातच तत्कालीन राज्यमंत्री संतोष शुल्का यांची हत्या केली होती. याशिवाय गुड्डनविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. 3 जुलैलला उत्तर प्रदेश पोलिस विकास दुबेला अटक करण्यासाठी कानपूर येथे गेले असता त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात आठ पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून विकास दुबे फरार होता. पोलिसांनी तपासादरम्यान विकास दुबेच्या काही साथीदारांना ठार केलं आहे

( संकलन - सुमित बागुल )

two more members form vikas dubeys gang arrested from thane city

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT