आठवडाभरात दोन एनएमएमटी बसचालकांना मारहाण 
मुंबई

आठवडाभरात दोन एनएमएमटी बसचालकांना मारहाण

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : टेम्पोचालकाने व त्याच्या सहकाऱ्याने सानपाडा बस स्थानकाजवळ एनएमएमटीप्रभावी बसचालकाला बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी (ता. १) रात्री घडली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सानपाडा पोलिसांनी टेम्पोचालकासह त्याच्या सहकाऱ्यावर गुन्हा दाखल करून, त्यांचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, गत आठवड्याच याच ठिकाणी एनएमएमटी बसचालकाला मारहाण झाली होती. 

तक्रारदार बस चालक संतोष सकपाळ (५८) हे शनिवारी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास, सानपाडा स्थानकातून तुर्भे स्थानकात बस रिकामी घेऊन जात होते. यावेळी स्थानकातून बाहेर पडताना, पुढे उभ्या असलेल्या टेम्पोचालकाला सकपाळ यांनी टेम्पो पुढे घेण्यास सांगितले. या गोष्टीचा त्याला राग आल्याने सहकाऱ्यासह त्याने बसमध्ये घुसून बसचालक सकपाळ यांना शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर दोघांनी आपला टेम्पो घेऊन पलायन केले. या घटनेनंतर सकपाळ यांनी सानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी टेम्पोचालक व त्याच्या सहकाऱ्यावर सरकारी कामात अडथळा आणून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

एनएमएमटी व्यवस्थापकांचे आयुक्तांना पत्र
गत आठवड्यातदेखील (ता. २३) सानपाडा स्थानकाजवळ स्कुटीवरून जाणाऱ्या अज्ञात व्यक्तीने किरकोळ कारणावरून एनएमएमटीचालकाला मारहाण केली होती. या मारहाणीत चालक ज्योतीराम निळकंठ वडजेंना (३२) गंभीर दुखापत होऊन, ते जखमी झाले होते. याबाबत व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांनी पोलिस आयुक्तांना पत्र लिहून एनएमएमटी बसचालक व वाहकांना मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai port oil tanker arrival: होर्मुझचा धोकादायक मार्ग पार करत पहिले तेलवाहू जहाज मुंबई बंदरात दाखल! व्हिडिओ पाहा...

Gas Cylinder Shortage: विद्यार्थ्यांच्या मेसवर टांगती तलवार! सिलिंडरच्या टंचाईने जेवणाचे दर वाढले

Latest Marathi News Live Update : आखाती युद्धाचा फटका; टरबूज उत्पादक शेतकरी अडचणीत

Nanded Student Protest: शिक्षणाच्या बाजारीकरणाविरोधात नांदेडमध्ये ‘अभाविप’चा विद्यार्थी आक्रोश मोर्चा

Sangamner News: संगमनेरमध्ये गॅससाठी एजन्सीबाहेर नागरिकांच्या रांगा; कमर्शियल सिलिंडर मिळत नसल्याने हॉटेल व्यावसायिक संकटात!

SCROLL FOR NEXT