मुंबई

खासगी कार्यालयांवर पालिकेची नजर, लोकलमधील गर्दीही कमी होणार; पालिकेचे एकाच दगडात दोन पक्षी

समीर सुर्वे

मुंबई, ता. 25 : खासगी कार्यालयांना 50 टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थीतीत सक्तीची करण्यात आली आहे. खासगी कार्यालयांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी ‘विशेष पथका’वर सोपविण्यात आली आहे. या निर्णयाची काटेकोर अमंलबजावणी करुन लोकलमधील गर्दी कमी करण्याचा महानगर पालिकेचा विचार आहे.

मुंबईतील कोविडने कळस गाठण्यास सुरवात केली आहे. बुधवारी 5 हजारहून अधिक रुग्णांची नोंद झाली असून पुढेही वाढ होत राहील असा पालिका प्रशासनाचा अंदाज आहे. मात्र, थेट लॉकडाऊन करण्यापेक्षा यापुर्वी तयार करण्यात आलेल्या नियमावलीची काटेकोर अमंलबजावणी करण्यावर महानगर पालिका भर देणार आहे.

‘खासगी कार्यालयांना 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थीतीत काम करण्याचे निर्देश दिले आहेत. यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक प्रभागात तयार करण्यात आलेल्या पथकांवर देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांनी दैनंदीन उपस्थीतीत कमी झाल्यास लोकलमधील गर्दीही कमी होईल’, असे अतिरीक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

म्हणून नियमांचे पालन आवश्‍यक

  • लॉकडाऊन हा वैद्यकिय यंत्रणा उभारण्याची प्रशासनाला तयारी करण्यासाठी तसेच अचानक रुग्णवाढ झाल्यास करावा लागणारा पर्याय आहे.
  • सध्या कोविडच्या चाचण्या वाढविण्यात आल्या असून त्यामुळे रुग्णवाढ होत आहे. त्यामुळे पुढील विचार करुन पालिकेने आरोग्य व्यवस्थेची तयारी करुन ठेवली आहे.
  • मात्र, गर्दीमुळे कोविडचा संसर्ग वाढू नये म्हणून नियमांची काटेकोर पालन करुन त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
  • यासाठी कोविड नियमावलीचे काटेकोर पालन करण्यावर प्रशासनाकडून भर दिला जात आहे. जेणेकरुन लॉकडाऊन सारखा शेवटचा पर्याय टाळता येऊ शकतो. 

कोविड नियमावलीची अमंलबजावणी करण्यासाठी पालिकेच्या प्रत्येक प्रभागात पाच पथके तयार केली आहे. या पथकांमार्फत आतापर्यंत विवाहसोहळे, बार, पब यांवर लक्ष ठेवले जात होते. मात्र, आता खासगी कार्यालयातही हे पथक लक्ष ठेवणार आहे.

two in one approach of BMC to reduce crowd of mumbai local and to keep an eye on offices amid corona


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results Live : मुंबईत आतापर्यंत कुणाला किती जाता? वाचा पक्षनिहाय यादी

Maharashtra Municipal Election Results 2026 : मराठवाड्यातही महायुतीची सरसी ! छ.संभाजीनगरमध्ये भाजप आघाडीवर तर शिवसेना 'इतक्या' जागांवर पुढे

Tejaswi Ghosalkar: पतीची हत्या, निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची साथ सोडली; भाजपच्या तिकिटावर विजयी

Malegaon Municipal Election Result 2026 Won Candidate : मालेगावात मोठा राजकीय उलटफेर; महापालिकेत कुणाची बाजी? वाचा विजयी उमेदवारांची यादी

Ichalkaranji Election Result : इचलकरंजीत संजय तेलनाडेंसह कुटुंबातील दोन सदस्यांचाही विजय; राहुल आवाडेंच्या कट्टर समर्थकाचा पराभव

SCROLL FOR NEXT